नवी दिल्ली: भारतीय कृषी उत्पादनांची (Agriculture Production) पहिल्यांदाच ५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर निर्यात (Export) झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात निर्यातीला चालना मिळाली आहे. यामध्ये साखर, (Sugar) तांदूळ, (Rice) गहू आणि अन्य अन्नधान्यांच्या निर्यातीत वाढ झाल्याचे शासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
केंद्रीय औद्योगिक विदा आणि संख्याशास्त्र महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ वर्षात निर्यात वाढून ५०.२१ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत १९.९२ टक्के अधिक आहे. २०२०-२१ मध्ये ४१.८७ अब्ज डॉलरच्या १७.६६ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत वाढीचा दर लक्षणीय आहे तसेच मालवाहतुकीचे अधिक दर, कंटेनर टंचाई इत्यादींच्या रूपात अभूतपूर्व आव्हाने असतानाही हे साध्य केले गेले आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
गव्हाच्या निर्यातीमध्ये (Wheat Export) २७३ टक्क्यांहून अधिक अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. २०२०-२१ मध्ये ५६८ दशलक्ष डॉलरवरून २०२१-२२ मध्ये २११९ दशलक्ष डॉलरवरून च्या जवळपास चार पटीने उडी मारली आहे. या उत्पादनांच्या निर्यातीत (Export) वाढ झाल्यामुळे पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. भारताने ५० टक्के जागतिक तांदूळ बाजार काबीज केला आहे.
सागरी उत्पादनांची निर्यात, (Exports of marine products,) ७.७१ अब्ज अमेरिकन डॉलर ही आतापर्यंतची सर्वोच्च आहे. ज्यामुळे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात या किनारी राज्यांतील शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
मसाल्यांची निर्यात (Spice Export) सलग दुसऱ्या वर्षी ४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. प्रचंड समस्यांना तोंड देत असतानाही, कॉफीची निर्यात प्रथमच १ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक ओलांडली आहे, ज्यामुळे कर्नाटक, केरळ (Keral) आणि तमिळनाडूमधील कॉफी उत्पादकांना (Coffee Export) याचा लाभ झाला आहे.
सर्वाधिक निर्यात (Export) झालेले अन्नधान्य (अमेरिकन डॉलरमध्ये)
तांदूळ---९.६५ अब्ज
गहू---२.१९ अब्ज
साखर ४.६ अब्ज
इतर तृणधान्ये---१.०८ अब्ज)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.