जळगावात गवार, कांदा, केळीत तेजीचे संकेत
जळगावात गवार, कांदा, केळीत तेजीचे संकेत 
बाजारभाव बातम्या

जळगावात गवार, कांदा, केळीत तेजीचे संकेत

टीम अॅग्रोवन

जळगाव ः बाजारात गत आठवड्यात गवार व कांदा यांची आवक काहीशी घटली. गवारला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार रुपये तर कांद्यालाही सरासरी साडेतीन हजार रुपये दर एक क्विंटलमागे मिळाला. तसेच केळीचे दरही ९५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते. निर्यातक्षम केळीचा तुटवडा असून, पुढे दरवाढीचे संकेत गवार, केळीसंबंधी मिळत आहेत. 

बाजार समितीमध्ये गवारची आवक प्रतिदिन अडीच क्विंटल एवढी राहिली. तिला एकच दर होता. सरासरी तीन हजार रुपये क्विंटल दर कायम राहिला. दोन दिवस ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांद्याची प्रतिदिन आवक २०० क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल १६०० ते चार हजार आणि सरासरी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लाल कांद्याची आवक अधिक राहिली. पांढऱ्या कांद्याची आवक प्रतिदिन २० क्विंटलपर्यंत होती.

मागील सप्ताहात बटाट्याची प्रतिदिन आवक २५० क्विंटल होती. त्याला ३५० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. सरासरी ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भरीताच्या वांग्याची प्रतिदिन २३ क्विंटल आवक होती. त्याला ६०० ते १२०० आणि सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. टोमॅटोची प्रतिदिन २० क्विंटल आवक राहिली. त्याला ८०० ते १२०० आणि सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मेथीची प्रतिदिन सात क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १००० आणि सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

पेरूची आवक प्रतिदिन पाच क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये आणि सरासरी ९०० प्रतिक्विंटलचा दर राहिला. सोयाबीनची आवक प्रतिदिन २०० क्विंटल होती. त्याला २६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. उडदासह मुगाच्या आवकेत घट झाली. त्यांना प्रतिक्विंटल कमाल ४८०० रुपयांपर्यंत दर होता, अशी माहिती मिळाली. 

केळीचे दर स्थिर कांदेबाग केळीचे दर स्थिर होते. चोपडा व जळगाव, जामनेरातच कांदेबाग आहेत. रावेर, यावलमध्ये जुनारी केळी काही प्रमाणात आहे. सध्या थंडीमुळे केळी परिपक्व होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दुसऱ्या बाजूला निर्यातक्षम केळीचा तुटवडा होता. कांदेबाग केळीला (साधारण) प्रतिक्विंटल ९५० रुपये दर मिळाला. तर जुनारीचे दरही ८०० रुपये प्रतिक्विंटल राहीले.

चोपडा तालुक्‍यातील सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्ये पिकणाऱ्या निर्यातक्षम कांदेबाग केळीला १२०० रुपये प्रतिक्विंटल म्हणजेच ऑन प्रकारचे दर मिळाले. पंजाब, दिल्ली, हरियाना, उत्तराखंड येथून केळीला मागणी आहे. जम्मू येथील केळी निर्यात मागील आठवड्यात ठप्प होती. मुंबई येथूनही केळीची मागणी कायम राहिली. त्यामुळे बिगर निर्यातक्षम केळीच्या दरात घसरण झाली नाही, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT