सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`
सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे` 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`

Sudarshan Sutaar

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याचे दर 'जैसे थे' राहिले. कांद्याला सर्वाधिक १३०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवकही कमीच होते आहे. रोज जेमतेम ८ ते १० गाड्या आवक झाली. आवक कमी असली, तरी मागणीही कमीच राहिली. त्यामुळे दर काहीसे स्थिर राहिले. कांद्याची सगळी आवक स्थानिक भागासह बाहेरील जिल्ह्यांतून राहिली, आवक आणि मागणीतील ही तफावतच दरातील स्थिरता टिकून राहण्यास पूरक ठरते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये इतका दर मिळाला.

त्याशिवाय फळभाज्यांच्या दरातही काहीशी सुधारणा राहिली, त्यातही टोमॅटो, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ५० ते १०० क्विंटल पर्यंत राहिली. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी ८० ते १७० रुपये आणि वांग्याला १०० ते २५० रुपये असा दर राहिला. हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिदहा

किलोसाठी १०० ते २५० रुपये, ढोबळी मिरचीला १८० ते २५० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरात मात्र या सप्ताहात काहीसा चढ-उतार झाला, भाज्यांची आवक मात्र रोज ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत झाली. कोथिंबिरीला प्रतिशंभर पेंढ्यांसाठी ३०० ते ४०० रुपये, मेथीला २०० ते ३०० रुपये आणि शेपूला २०० ते २५० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT