मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतार
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतार 
बाजारभाव बातम्या

मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतार

Santosh Munde

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मोसंबी आणि डाळिंबाच्या दरात चढउतार पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचाही बाजारातील आवकेवर, आलेल्या मालाच्या उचलीवर व त्या अनुषंगाने दरावर परिणाम होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३१ जुलैला २० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर याच दिवशी ८७ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर २००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १ ऑगस्टला ८ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर ६० क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

२ ऑगस्टला १५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर ७६ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ ऑगस्टला २८ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर १०९ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ७०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

९ ऑगस्टला ७ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर १५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विटंलचा दर मिळाला. ११ ऑगस्टला ३९ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, तर ७६ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला २०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT