कांदा
कांदा 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात कांद्याचे दर टिकून

Sudarshan Sutaar

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक चांगली झाली; पण मागणीतील तूट काहीशी वाढल्याने कांद्याच्या दरातील किरकोळ चढ-उतार वगळता कांद्याचे दर टिकून राहिले.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २०० ते ३०० गाड्यापर्यंत राहिली. सर्वाधिक आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक कमीच राहिली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवकेचा विचार करता, आवक जैसे थे आहे; पण मागणीत काहीशी तूट असल्याने दरावर त्याचा परिणाम झाला. सप्ताहाच्या सुरवातीला दरावर त्याचा प्रभाव झाला; पण नंतर दरात फारसा फरक झाला नाही. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते १५०० व सरासरी ९०० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे भाज्यांनाही या सप्ताहात चांगला उठाव मिळाला. त्याचे दर मात्र स्थिर होते. विशेषतः मेथीला मागणी राहिली. भाज्यांची आवक स्थानिक भागातून झाली. रोज प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यापर्यंत आवक होती. मेथीला शंभर पेढ्यासाठी ४०० ते ५५० रुपये, शेपूला २५० ते ४०० रुपये, कोथिंबिरीला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. फळभाज्यामध्ये हिरवी मिरची, कोबी, फ्लाॅवरच्या दरात पुन्हा तेजी राहिली. त्यांची आवक रोज प्रत्येकी २ ते ३ गाड्या झाली. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २०० रुपये, कोबीला ८० ते १५० रुपये आणि फ्लाॅवरला १७० रुपये असा दर मिळाला.  ढोबळी मिरची, गवारच्या दरातील तेजी काहीशी टिकून होती. ढोबळी मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २०० रुपये, गवारला २०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT