Onion rate on high
Onion rate on high 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात कांद्याला कमाल ११ हजार दर

टीम अॅग्रोवन

सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २५) कांद्याच्या भावाने आणखी उसळी घेतली. गेल्या आठवड्यात नऊ हजारांवर गेलेला कांदा सोमवारी थेट ११ हजार रुपयांवर पोचला. बाजार समितीत यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे. 

सोमवारी बाजार समितीमध्ये २० हजार २५६ क्विंटल म्हणजे जवळपास २०५ ट्रक कांद्याच्या गाड्यांची आवक झाली. या आधी बाजार समितीमध्ये २१ नोव्हेंबरला आठ हजार आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी २२ नोव्हेंबरला नऊ हजार, २३ नोव्हेंबरला नऊ हजार ६०० रुपयांपर्यंत कांद्याचा भाव गेला होता. रविवारी बाजाराला सुटी होती. त्यामुळे आज पुन्हा सलग चौथ्या दिवशी कांद्याच्या भावाने उच्चांक करत ११ हजारांचा टप्पा पार केला. सोलापूर बाजार समितीमध्ये यंदा सर्वाधिक १८० ट्रक गाड्यांची आवक झाली होती. आज त्यामध्येही वाढ होऊन गाड्यांची संख्या २०५ वर गेली आहे. यापूर्वी तीन हजार २०० रुपयांचा असलेला सरासरी दरही आता तीन हजार ८०० रुपयांवर पोचला आहे, असे असले तरी कांद्याची ही आवक स्थानिक भागातून कमीच आहे. सध्याची आवक प्रामुख्याने बाहेरील जिल्ह्यातून आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कांदा ५०० ते ७०० रुपये क्विंटल दराने खरेदी होत होता. यंदा मात्र चित्र काहीसे बदलल्याचे दिसते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT