नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटल
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटल 
बाजारभाव बातम्या

नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटल

Suryakant Netke

नगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर बाजार समितीत मुगाची आवक वाढली आहे. गतसप्ताहात नगरला ५१४ क्विंटल मुगाची आवक झाली. मुगाला ५५२५ ते ६००३ व सरासरी ५७६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीत मोसंबी, संत्रा, पपई, सीताफळ, पेरू, कलंगड फळांचीही आवक सुरू आहे.

नगर जिल्ह्यामध्ये खरिपात मुगाचे क्षेत्र जास्ती असते. यंदाही पेरणीक्षेत्र जास्त असले तरी पाऊस नसल्याने उत्पादनात घट झाली. आता पीक हाती आल्याने मुगाची बाजारात आवक सुरू झाली आहे. गत सप्ताहात ज्वारीची १४५ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला १९०० ते १९८१ रुपये दर मिळाला. बाजरीची ६७ क्‍लिंटलची आवक होऊन १३५० ते १५५१ रुपये दर मिळाला. तुरीची १०९ क्विंटलची आवक झाली आणि तुरीला ३२०० ते ३४०० रुपये दर मिळाला.

हरभऱ्याची ३७२ क्विंटलची आवक होऊन ३३०० ते ३७५० रुपये दर मिळाला. गव्हाची २४७ क्विंटलची आवक होऊन गव्हाला १९०० ते २१७५ रुपये दर मिळाला. उडदाची आवक अजून होत नाही. गतसप्ताहात उडदाची १४ क्विंलटची आवक होऊन २५०० ते ३००० हजार रुपये दर मिळाला.

नगरला फळांचीही चांगली आवक होत आहे. गत सप्ताहात मोसंबीची १२१ क्विंटलची आवक झाली. मोसंबीला प्रतिकिलो दहा रुपये ते तीस रुपये दर मिळाला. पपईची ६६ क्विंटलची आवक झाली. पपईला प्रतिकिलो दहा रुपये ते पंचवीस रुपये दर मिळाला. अननसाची ९४५ क्विंटलची आवक होऊन दहा ते तीस रुपये दर मिळाला.

कलिंगडाचीही २६ क्विंटल आवक झाली. कलिंगडाला ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. सीताफळाची आवक सुरू झाली असून आठवडाभरात ७० क्विंटल आवक झाली. सीताफळाला १५ ते ३५ रुपये प्रतिकिलोला दर मिळाला. भाजीपाल्यात मेथी, पालक, कोबी, फ्लावर, टोमॅटो, बटाटे, वांगी, शेवगा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पालक, कोथिंबीर, गवार, भेंडीची बऱ्यापैकी आवक झाली. भाजीपाल्याचे दर सध्या स्थिर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT