नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार-पाच दिवसांत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कारले, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबिरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे. भुसारमध्ये काहीशी ज्वारीची आवक सुरू झाली असून, प्रती क्विंटलला साडेतीन हजारांपर्यंतच दर मिळत आहे.
कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याने लॉकडाउन होण्याची शक्यता दिसत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दररोज सुमारे आठशे ते साडेआठशे क्विंटल भाजीपाला बाजार समितीत येत आहे.
बाजार समितीत दर दिवसाला टोमॅटोची १०१ क्विंटलची आवक होऊन १००० ते १५००, वांगीची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, फ्लॉवरची ८० ते ९० क्विंटलची आवक होऊन १००० ते १५००, कोबीची ९० ते १०० क्विंटलची आवक होऊन २०० ते ३००, काकडीची १५ ते २५ क्विंटलची आवक होऊन १००० ते १५००, गवारची ५ ते १० क्विंटल आवक होऊन ६००० ते ७०००, घोसाळेची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते अडीच हजार, दोडक्याची १९ ते २२ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, हिरव्या कैरीची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन २००० ते ३०००, भेंडीची १० ते १२ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते साडेतीन हजार, वालाची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, घेवड्याची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते साडेतीन हजार, वाटाण्याची १९ ते २० क्विंटलची आवक होऊन ५००० ते ६०००, बटाट्याची २१० क्विटंलची आवक होऊन ८०० ते १२००, लसणाची १५ ते १७ क्विंटलची आवक होऊन ६००० ते ७०००, हिरवी मिरचीची ९० क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४५०० व सिमला मिरचीची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन २००० ते २ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला.
पालेभाज्या शंभर जुड्या मेथीला ५०० ते १२००, कोथिंबिरीला ५०० ते ११००, पालकाला ५०० ते १०००,करडईला ५०० ते ७००, शेपूला ५०० ते ७०० रुपयाचा दर मिळाला. ज्वारीची अल्प आवक बाजार समितीत भुसारमध्ये काहीशी ज्वारीची आवक सुरू झाली असली तरी दर वर्षीच्या तुलनेत अजूनही फारशी आवक नाही. ज्वारीला प्रती क्विंटलला दोन हजार ते साडेतीन हजारांपर्यंतच दर मिळत आहे. बाजरीला १२०० ते १४००, हरभऱ्याला ४५०० ते ४७००, गव्हाला १७०० ते २०००, चिंचेला ६००० ते १४०००, गूळ २५०० ते ३५०० रुपयाचा दर मिळत असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.