औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ११) अंजिराची २२ क्विंटल आवक झाली. या अंजिराला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी डाळिंबांची ३७ क्विंटल आवक झाली. त्यांना २०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १३०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६५ क्विंटल आवक झालेल्या ॲपल बोरला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. संत्र्यांची आवक ३३ क्विंटल तर, दर १४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३५ क्विंटल आवक झालेल्या पेरूला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या खरबुजाचे दर २२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५५ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
कांद्याची ५८२ क्विंटल आवक झाली. त्यांना दर १००० ते ३५०० रुपये मिळाला. ५६ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९१ क्विंटल, तर दर १००० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. वांग्याची आवक ५६ क्विंटल, तर दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या गवारीला ४००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ३५ क्विंटल तर, दर ६०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १३ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
कोबीची १५७ क्विंटल आवक झाली. तिला ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लिंबांची आवक १५ क्विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २८ क्विंटल आवक झालेल्या पपईचे दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १८ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ३८ क्विंटल, तर दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११८ क्विंटल आवक झालेल्या गाजराला ८०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५ क्विंटल आवक झालेल्या वाल शेंगेला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
१६ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ७० ते १८० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक २६ हजार जुड्यांची झाली. तिला १०० ते १४० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ३७ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६० ते १३० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.