1000 to 3000 green chillies in the state
1000 to 3000 green chillies in the state 
बाजारभाव बातम्या

राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपये

टीम अॅग्रोवन

जळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची १९ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८००, तर सरासरी २२०० रुपये दर मिळाला.

आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, यावल, औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, जालना भागातून होत आहे. दर टिकून आहेत, अशी माहिती मिळाली. 

पुण्यात प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १५० ते २५० रुपये दर होते. 

मिरचीची प्रामुख्याने होणारी आवक ही आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरता येथून होत आहे. सध्याची कोरोना टाळेंबदीची परिस्थिती हॉटेल, खानावळी बंद असल्याने मागणी कमी आहे. परिणामी, आवक सरासरी असली तर दर कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागणी असली की सरासरी दर हे ३०० ते ३५० रुपये असतात.

परभणीत प्रतिक्विंटलला १८०० ते २५०० रुपये

परभणी ः येथील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीलाला प्रतिक्विंटल किमान १८०० ते कमाल २५०० रुपये, तर सरासरी २१५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या चार दिवसांत प्रतिदिन १५ ते २५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली.

घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सांगलीत क्विंटलला १५०० ते २५०० रुपये

सांगली ः येथील शिवाजी मंडईत हिरव्या मिरचीची आवक कमी, अधिक होत आहे. गुरुवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची ८० ते ९० पिशव्यांची (एक पिशवी १० ते १५ किलोची) आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २५०, तर सरासरी २०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत आष्टा, वाळवा, दुधगाव, मिरज, आरग, यासह विटा, कडेगाव तालुक्यातून मिरचीची आवक होते. बुधवार (ता.१९) हिरव्या मिरचीची  १०० ते १२० पिशव्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस  १२०  ते २६० तर सरासरी १८० रुपये असा दर होता.

मंगळवार (ता.१८ ) हिरव्या मिरचीची १५० ते २०० पिशव्यांची आवक झाली  होती. तिला दहा किलोस  १४०  ते ३०० तर सरासरी २५० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता.१७) हिरव्या मिरचीची ७० ते १२० पिशव्यांची आवक झाली. त्या वेळी दहा किलोस १०० ते २०० तर सरासरी १७० रुपये असा दर मिळाला.

नांदेडमध्ये क्विंटलला १५०० ते २००० रुपये

नांदेड : नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडानाका भागातील ठोक बाजारात हिरव्या मिरचीची आवक सर्वसाधारण आहे. यास दीड हजार ते दोन हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे मिरची विक्री होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नांदेड शहरातील इतवारा तसेच पूर्णा रस्त्यावरील तरोडा नाका बाजारात भाजीपाल्याचे बिट होते. या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणतात. सध्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक दररोज दहा ते पंधरा क्विंटल होत आहे.

या मिरचीला दीड हजार ते दोन हजार रुपये दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे हिरवी मिरची विकत आहे. लाॕकडाउनमुळे बाजारात मिरचीची मागणी घटल्यामुळे दर सर्वसाधारण आहेत.

अकोल्यात क्विंटलला २५०० ते ३००० रुपये

अकोला ः येथील जनता भाजी बाजारात हिरव्या मिरचीला गुरुवारी (ता.२०) क्विंटलला २५०० ते ३ हजारांदरम्यान दर मिळाला. सध्या कोरोना निर्बंधामुळे बाजारातील विक्री व्यवस्था कोलमडलेली असल्याचा परिणाम मिरचीच्या दरावर पडत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

येथील बाजारात गुरुवारी ४० ते ४५ क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीची आवक झाली होती. यातील काही मिरची स्थानिक भागातून, तर काही मिरची इलाहाबादकडून विक्रीसाठी आली होती. चांगल्या दर्जाची मिरची २५०० ते तीन हजारांदरम्यान विकली गेली. दुय्यम दर्जाची १८०० ते २५०० दरम्यान विकली. गेल्या आठवड्यात बाजार बंद होते. 

आता निर्बंधात थोडी सूट मिळाल्याने बाजार सुरु झाला आहे. मात्र ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद असल्याने उठाव तितका होताना दिसत नाही. जोपर्यंत बाजार सुरळीत सुरु होत नाहीत, तोवर दरामध्ये फारशी सुधारणा होण्याची चिन्हे नसल्याचेही व्यापारी सूत्रांनी सांगितले.

सोलापुरात क्विंटलला १००० ते २५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीला चांगली मागणी राहिली. मागणी वाढल्यामुळे दरही टिकून राहिले. प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज १०० ते २५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गेल्या काही दिवसांपासून आवकेत सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण मागणी कायम असल्याने दर टिकून आहेत. हिरव्या मिरचीची आवक स्थानिक भागातूनच झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवक अशीच रोज ८० ते १५० क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा मिळाला. प्रतिक्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर काहीसे स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT