Zilla Parishad News Agrowon
ताज्या बातम्या

Amravati ZP : ‘झेडपी’ कर्मचाऱ्यांना मिळणार एक तारखेलाच वेतन

Latest Agriculture News ; राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव तसेच सहसंचालक रा. प्र. भोईर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्या संबंधीचे निर्देश दिले आहेत.

Team Agrowon

Amravati News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनाची नेहमीच अनिश्‍चतता राहते. यामुळे त्यांना थकित कर्जाचा भरणा व गृहखर्चाचा ताळमेळ लावताना अडचणीत येत असल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेला खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव तसेच सहसंचालक रा. प्र. भोईर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्या संबंधीचे निर्देश दिले आहेत. सध्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन पाच तारखेनंतरही होत नाही अशी स्थिती आहे. वेतनाबाबत दर महिन्याला अनिश्‍चितता राहत असल्याने या कर्मचाऱ्यांना गृहकर्जाचे हप्ते वेळेवर देता येत नाही.

उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांना वेळेवर पैसे पाठविण्यात, औषधोपचारासाठी अडचणी येतात. या सर्व बाबींचा विचार करता कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत करावे, अशी मागणी संघटनांची होती. शासनाकडून वेतनाबाबत १५ तारखेपर्यंत अहवाल सादर करण्यास सांिगतले. शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने वेतनाला विलंब होते, अशी स्थिती आहे. संघटनांची मागणी पाहून एक तारखेला वेतन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दोन महिन्यांचे वेतन थकित

एक तारखेला पगाराचे आदेश असले तरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. काही कर्मचाऱ्यांचे तर दोन महिन्यांचे वेतन थकित आहे. परिणामी, एक तारखेला वेतन या आदेशाची अंमलबजावणी कशी होईल, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Acquisition: शेतजमिनीचे बेकायदेशीर अधिग्रहणाचा आरोप

Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बी पेरा पावणेदोन लाख हेक्टरवर

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस आवक मंदावली, मटारच्या दरात नरमाई, बटाटा आवक चांगली तर ज्वारीचे दर टिकून

Ramling Sanctuary: रामलिंग अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्याची वर्षपूर्ती

Urea Smuggling: युरिया तस्करीचा डाव उधळला

SCROLL FOR NEXT