Yavatmal ZP : यवतमाळ जिल्हा परिषदेत ८८ हजार अर्जांचा पाऊस

ZP Recruitment : आहेत. या रिक्तपदांसाठी जिल्हा परिषदेत तब्बल ८८ हजार ७५२ अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
Yavatmal ZP
Yavatmal ZPAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत गट ‘क’मधील सरळसेवेची ८७५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्तपदांसाठी जिल्हा परिषदेत तब्बल ८८ हजार ७५२ अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. त्यातून शासनाला ८ कोटी दोन लाख १७ हजार १०० रुपयांचा महसूल मिळाला.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेत पदभरती झाली नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष सरळसेवा पद भरतीकडे लागले होते. तलाठीपदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. त्यासाठी लेखी परीक्षाही पार पडली. आता जिल्हा परिषदेच्या लेखी परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागले आहे.

Yavatmal ZP
Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत गट ‘क’ वर्गाची भरती प्रक्रिया सुरू

२५ ऑगस्ट ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मुदतवाढ न मिळाल्याने बहुतांश विद्यार्थी अखेरच्या दिवशी सर्व्हर डाऊनमुळे उमेदवारी अर्ज करण्यापासून वंचित राहिल्याची ओरड होत आहे. ग्रामसेवकपदासाठी सर्वाधिक उमेदवारांच्या उड्या पडल्या आहेत.

Yavatmal ZP
Nashik ZP : जिल्हा परिषद परत करणार १.७१ कोटीचे परीक्षाशुल्क

अर्ज भरल्यानंतर शासकीय नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांनी अभ्यासाचा वेग आणखी वाढविला आहे. मागासवर्गीय उमेदवारांकडून ९०० तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यातून शासनाकडे यवतमाळ जिल्ह्यात आठ कोटी दोन लाखांचा निधी जमा झाला आहे.

‘ओबीसी’तून सर्वाधिक अर्ज

ओबीसी प्रवर्गातून सर्वाधिक २६ हजार ४०१ अर्ज आलेत तर, एससी प्रवर्गातून दुसऱ्या क्रमांकावर २० हजार ३१९ अर्ज आले. एसटी प्रवर्गात ११ हजार ६८७, व्हीजे (ए) तीन हजार ३१, एनटी (बी) दोन हजार ७२, एनटी (सी) तीन हजार ३९६, एनटी (डी) तीन हजार १५७, एसबीसी ६८१, ईव्हीएस नऊ हजार २०१, खुलाप्रवर्गासाठी आठ हजार ८०७ असे एकूण ८८ हजार ७५२ अर्जांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com