Cabinet Decision Agrowon
ताज्या बातम्या

Cabinet Decision : सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव; नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Kharif Crop : माॅन्सूनच्या परतीच्या पावसाने राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचे तातडीने पंचनामे करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे.

Swapnil Shinde

Soybean mosaic virus : यंदाच्या खरीप हंगामात माॅन्सूनच्या पावसाचा मोठा खंड पडला. परंतु सप्टेंबरमध्ये झालेला परतीच्या पावसामुळे सोयाबीनवर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांला मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

माॅन्सूनच्या परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला. यामध्ये विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळामोझॅक या विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. सोयाबीनच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिक वाया झाल्याची भिती आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, यंदाच्या हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेत राज्यातील १ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडला आहे. अनेक मंडळांमध्ये २१ दिवसांचा खंड पडला आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढील आठवड्यात पीक विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मुंबईत बैठक होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT