Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची उघडीप कायम होती. तर तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची (Rain Update) उघडीप कायम होती. तर तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केला. तर राज्यात इतर ठिकाणी पावसाची विश्रांती कायम राहण्याची शक्यता आहे.

कोकणातही पावसाचा जोर कमीच होता. तर काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. पालघर जिल्ह्यातील डहाणू, मोखेडा, तलासरी या मंडळांत पावसाची भूरभूर सुरु होती. तर रागयगड जिल्ह्यातील म्हसला, मुरुड, मानेगाव, पोलादपूर या मंडळांमध्येही हलका पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र पावसाचा जोर कमीच होता.

मध्य महाराष्ट्रातील नगर. धुळे, जळगाव, नंदूरबार आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप होती. कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा, पन्हाळा या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर नाशिक जिल्ह्यातील हर्सूल, इगतपुरी, ओझरखेडा या मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची भूरभूर सुरु होती. तर सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रस येथे हलक्या सरी पडल्या. सातारा जिल्ह्यातही काही भागांत पावसाचा शिडकावा झाला.

मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप होती. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे हलक्या सरी पडल्या. तर इतर भागात पाऊस नव्हता. तर विदर्भातील बहुतांशी बागांत पाऊस नव्हता. अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप कायम होती.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदा, नांदगाव, मोर्शी आणि धामनगाव या मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. तर भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि तुमसर मंडळांत हलक्या सरी पडल्या. गोंदीया जिल्ह्यातील देवरी, गोरेगाव आणि तिरोरा या मंडळांमध्ये हलक्या सरी झाल्या. नागपूर जिल्ह्यात अनेक मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. तर वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची भूरभूर सुरु होती. यवतमाळ जिल्ह्यातही काही भागांत हलक्या सरी पडल्या. उद्या सकाळपर्यंत विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT