Nira River Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : शेतकऱ्यांपुढे जीवन-मरणाचा प्रश्‍न

Kharif Season 2023 : इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेली नीरा नदी व त्यावरील बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Team Agrowon

Nira Narsinhpur News : इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेली नीरा नदी व त्यावरील बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जनावरे आणि शेती वाचविण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्याची मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.

पाणी सोडले नाही तर मात्र शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होईल.नीरा नदीवर असणाऱ्या जवळपास सर्वच धरणांमध्ये ८० ते ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून नीरा नदीत पाणी सोडावे, असे मागणी शेतकरी व नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.

पावसाळा चालू होऊन चार महिने झाले असताना मात्र, पावसाचा एक थेंबही पडला नाही. नीरा नदीमध्ये तर चिमणीला पिण्यासाठीही पाणी नाही. त्यामुळे गुरे, ढोरे सोडून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नीरा नदीला जर पाणी सोडले नाही तर मात्र पाणी व चाऱ्याअभावी शेती व जनावरे सोडून देण्याची वेळ आली आहे. तरीही सरकारने लक्ष दिले नाही तर मात्र आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया मोहन शिवाजी खाडे, ज्ञानदेव नाना हेगडकर या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जनावरांस सोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ

राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. तर शेतकऱ्यांना हातची पिके जळताना पहावी लागणार आहे. शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची जनावरे सोडून द्यावी लागण्याची वेळ आली आहे. खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रेय भरणे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

पावसाची दडी

प्रतिवर्षी धरणाचा पाणलोट क्षेत्रातील पाऊस १५ ऑगस्टपर्यंत कमी होत असतो. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर नीरा नदीवर असणारे सर्व बंधारे ढापे टाकून पाण्याने पूर्ण भरून घेतले जातात. मात्र, यावर्षी अद्यापही पावसाने दडी मारल्याने नीरा नदीत पाणी सोडले गेले नसल्याने नदीवरील नरसिंहपूरपासून खोऱ्यापर्यंतचे अनेक बंधारे कोरडे पडले आहेत.

पावसाळा सुरू होऊन चार महिने संपत आले असतानाही मात्र पावसाने दांडी मारली आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नगदी व चारा पिके हातची गेली आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसायही अडचणी सापडला आहे. पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहील. तातडीने उपाययोजना केली नाही तर आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
- सुखदेव निकम, शेतकरी, बोराटवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT