Sangli Water Crisis : कर्नाटकात सामील करून घ्या ; पाणी संघर्ष समितीचा निर्वाणीचा इशारा

Mhaisal Irrigation Scheme : उमदी सह सीमाभागातील नागरिकांनी विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी उमदी बसस्थानकाजवळील नगर-विजयपूर महामार्गावर शुक्रवारी (ता. २५) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
Mhaisal Irrigation scheme
Mhaisal Irrigation schemeAgrowon

Sangli News : उमदी सह सीमाभागातील नागरिकांनी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी जिल्हा पातळीवर व तालुक्यात आंदोलन, उपोषण केली. मात्र, झोपेचे सोंग घेतलेले सरकार जागे होण्यास तयार नाही. यासाठी उमदीकरांकडून कर्नाटकात सामील करून घ्या, यासाठी उमदी भागातील नागरिक दंडवत आंदोलन करत कर्नाटक सरकारकडे साकडे घालणार आहेत, असा निर्णय पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Mhaisal Irrigation scheme
Sangli Rain : सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात १७२ मिलिमीटर पावसाची नोंद

उमदी बसस्थानकाजवळील नगर-विजयपूर महामार्गावर शुक्रवारी (ता. २५) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केल्याने आमच्यावर आंदोलनाची दुर्दैवी वेळ आली आहे. अशी भावना ही बैठकीत व्यक्त करण्यात आली. जत विस्तारित सिंचन योजनेच्या टेंडर झालेल्या कामाला सुरुवात करा आणि उर्वरित कामाची टेंडर काढा, या मागणीसाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने शासन दरबारी अनेकवेळा आंदोलन करूनही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या शुक्रवारी कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सीमेवर समितीच्या शेकडो कार्यकर्ते व नागरिक यांच्या वतीने दंडवत घालत आम्हाला ही कर्नाटकात सामील करा, यासाठी कर्नाटक सरकारकडे विनंती करणार आहेत.

Mhaisal Irrigation scheme
Crop Irrigation : टेंभू, म्हैसाळचं पाणी मुरतंय कुठं?

आता पाण्याचा प्रश्न मिटणार आणि कामाला सुरुवात होणार, या आशेने वाट पाहत असताना निविदा काढून आठ महिने झाले तरी अद्याप कामाला सुरू केली नाही. त्यामुळे दीड वर्षात जतच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी आणतो म्हणणाऱ्या मंत्र्यांना आठ महिने ओलांडले तरी कामाला सुरुवात करता आली नाही. दीड वर्षात पाणी काय पोहोच करणार, म्हणून आम्ही ९ ऑगस्ट क्रांती दिनी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

मंत्री उदय सामंत यांना स्मरणपत्र पाठवून आठवण करून दिली. याचाही परिणाम सरकारवर होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर जाऊन कर्नाटक राज्यात समावेश करावा म्हणून दंडवत घालण्याचा निर्णय घेतला आहे. दंडवत घालण्याचा कार्यक्रमानंतर उमदी बसस्थानकाजवळील नगर विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

तालुका पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, महंमद कलाल, चिदानंद संख, तानाजी मोरे, गोपाल माळी, अरविंद मुंगळे, केशव पाटील, तात्या कोळी, रियाज शेख, सिद्धू मडवळे, श्रीमंत परगोंड, कलाप्पा इंगळगी, सागर नागने, आपू कोरे, कामु बालगाव, मलाप्पा परगोंड आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com