पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा Water scarcity alleviation Complete tasks with priority 
ताज्या बातम्या

Water Use : महिलांनी जलसाक्षर होण्याची गरज ः चेकल्ला

‘पाणी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग’ वर कार्यशाळा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : वाटर कार्बन क्रेडिट (Water Carbon Credit) ही नवीन संकल्पना भूजल विभाग अमलात आणत आहे. पाणी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे. हे समजून घेऊन पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची गरज आहे.

घरात पाणी आल्यानंतर त्याचा जपून वापर केला पाहिजे. त्यासाठी महिलांनी जलसाक्षर होणे गरजेचे आहे,’’ असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सेवानिवृत्त सहसचिव जयलक्ष्मी चेकल्ला (Jayalakshmi Chekalla) यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत ‘पाणी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग’ या विषयावर शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागातील भूजल भवन येथे बुधवारी (ता. ८) कार्यशाळा झाली.

या वेळी आघारकर इस्टिट्यूटचे सेवानिवृत्त जीवाश्मशास्त्रज्ञ डॉ. कांतीमनी कुळकर्णी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, माधवी दुबे, डॉ. सोनाली शिंदे, अंकिता यादव, सुजाता सावळे, प्रीती देशमुख, भाग्यश्री साहू यांच्यासह महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

महिलाशक्तीचा गौरव
पाणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नवापूर (नंदुरबार) तालुक्यातील बोकळझर येथील सुमन गावित, बोरमणी (सांगोला) येथील अनिता माळगे यांना गौरव पुरस्कार, तर सुनीता केसकर, रूपाली कठरे यांना प्रशंसापत्र, दीपिका सोनी (बहादरपूर, मध्यप्रदेश), नंदा भुजबळ (शिक्रापूर), दीपाली पाटील (अटल भूजल विभाग) आदी महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

चेकल्ला म्हणाल्या, ‘‘ महिलांनी परिसरातील पाण्याचे स्त्रोतही जपले पाहिले. महिलांनी परिवार सांभाळताना पाणी, अन्न, शुभेच्छा ही तीन रत्ने जपून ठेवली पाहिजेत.’’

डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, ‘‘पाणी जपून ठेवण्यासाठी खडक महत्त्वाचा आहे. भूजलाची प्रत कशी असते ही खडकावर अवलंबून असते. आपल्या राज्यात चांगल्या प्रतीचा खडक असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते.

परंतु सध्याचा उपसा पाहता हे पाणी फार काळ टिकणार नाही. ही अनमोल संपत्ती जपण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढे येणे गरजेचे आहे.’’

जोशी म्हणाले, ‘‘आपले घर, व्यवसाय, करिअर उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या महिलांनी आता पाणी क्षेत्राकडे सुद्धा वळण्याची गरज आहे. घरगुती, शेती क्षेत्रातील पाणी वाचविताना आपल्या मुलांवर पाणी बचतीचे संस्कार केले पाहिजेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT