Food Processing Agrowon
ताज्या बातम्या

Food Processing : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत वाडेगावात कार्यशाळा

Micro Food Processing Industry Scheme : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे नुकतीय कृषी पायाभूत सुविधा निधी योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कार्यशाळा घेण्यात आली.

Team Agrowon

Akola News : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे नुकतीय कृषी पायाभूत सुविधा निधी योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश ठाकरे, प्रगतिशील शेतकरी उमेशआप्पा भुसारी, नाबार्डचे श्रीराम वाघमारे,मूल्यसाखळी तज्ञ राहुल ठाकरे ,वित्तीय सल्लागार विवेक जंवजाळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे, आत्माचे व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, कॅनरा बँकेचे मॅनेजर मंगेश गवई, प्रशांत पारतवार, सहदेव नळकांडे, श्यामराव शेलार, अनंता काळे यांची उपस्थिती होती.

विभागीय मूल्य साखळीतज्ज्ञ राहुल ठाकरे यांनी मायक्रो फूड प्रोसेसिंग, उद्योग बचतगट आणि सहकारी संस्थांकडून पतपुरवठा करण्याची क्षमता वाढवण्यास सक्षम करण्याविषयी मार्गदर्शन केले. मंगेश गवई यांनी बँकेमार्फत वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

रमेश ठाकरे यांनी महिला गटांनी तसेच बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, महिला शेतकरी गट, शेतकरी गटाचे अध्यक्ष, सदस्य, वैयक्तिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव केले. आभार व्ही. एम. शेगोकार यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Prices: सोयाबीन ठरणार ‘गोल्डन बीन’

India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

SCROLL FOR NEXT