Agricultural University Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural University : कृषी विद्यापीठात शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीवर कार्यशाळा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जाग भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प(नाहेप) आणि परभणी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने कृषी शिक्षणाकरिता प्रभावी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती या विषयावर सोमवार (ता.२१) आणि मंगळवारी (ता. २२) कार्यशाळा घेण्यात आली.

Team Agrowon

परभणी : वसंतराव  नाईक  मराठवाडा  कृषी  विद्यापीठातील  (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) जाग भारतीय  कृषी  संशोधन  परिषद (ICAR)  पुरस्‍कृत  राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प(नाहेप) आणि  परभणी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने कृषी शिक्षणाकरिता प्रभावी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती  या  विषयावर  सोमवार (ता.२१) आणि मंगळवारी (ता. २२) कार्यशाळा  घेण्यात आली.

कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले. डेहराडून येथील डून विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक (अभि.) प्रा. डॉ. गजेंद्र सिंह, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेतील संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ. सुदिप मारवाह, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. गिरिधर वाघमारे, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्‍हणाले, आज प्रत्‍येक शिक्षकांना स्‍वत: च्‍या विषयांची प्रभावी शैक्षणिक व्‍हिडिओ निर्मिती करता आली पाहिजे. प्रत्‍यक्ष वर्गातील अध्‍यापन हे प्रभावी असतेच परंतु शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केल्‍यास विद्यार्थ्‍यांना कोणत्‍याही वेळेस व्हिडिओच्‍या माध्यमातून विषय समजून घेता येऊ शकेल.

नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विद्यापीठ अधिस्‍वीकृती च्‍या दृष्‍टीने दर्जेदार शैक्षणिक साहित्‍य निर्मिती करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. सिंह म्‍हणाले, की माहिती तंत्रज्ञानाच्‍या काळात शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणे शक्‍य आहे.

प्रत्‍येक प्राध्‍यापकांनी ही कला अवगत करावी तर  डॉ. मारवाह  म्‍हणाले की,प्र भावी व्हिडिओ निर्मितीबाबत परभणी कृषी विद्यापीठाने विशेष कार्यशाळेचे आयोजन केल्‍यामुळे आयसीएआरच्‍या माध्यमातून ॲग्री दिक्षा पोर्टलवर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ उपलब्‍ध होऊ शकतील. कार्यशाळेत नगर येथील नॉलेज ब्रिज संस्‍‍थेचे प्रशिक्षक भूषण कुलकर्णी, एकनाथ कोरे यांनी प्रभावी शैक्षणिक व्‍हिडिओ निर्मितीवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT