MPKV, Rahuri : जगातील अग्रेसर कृषी विद्यापीठांशी फुले विद्यापीठाचा करार व्हावा

राधाकृष्ण विखे-पाटील : महसूलमध्ये ड्रोनचा वापर वाढवणार
MPKV, Rahuri
MPKV, RahuriAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर : कृषी क्षेत्राने (Agriculture Sector) मोठ्या प्रमाणात भरारी घेतली आहे स्टार्टअपच्या (Startup) माध्यमातून शेतकरी उद्योजकांना नवी ऊर्जा मिळत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (MPKV, Rahuri ) भारताअंतर्गत विद्यापीठाशी किंवा परदेशातील काही संस्थांशी करार केलेले आहेत; मात्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विकासात्मक दृष्टीने जगात जे अग्रेसर असणाऱ्या पाच-दहा विद्यापीठे आहेत, त्यांच्याशी करार होणे अपेक्षित आहे, असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी व्यक्त केले.

MPKV, Rahuri
MPKV Rahuri : एमपीकेव्ही, मिटकॉनमध्ये सामंजस्य करार

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शनिवार पासून सुरू झालेल्या ‘इंद्रधनुष्य २०२२’ हा १८ वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील अध्यक्षस्थानी होते. अभिनेते भारत गणेशपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, डॉ. प्रमोद पाबरेकर, कुलसचिव प्रमोद लहाळे, आमदार किशोर दराडे आदींसह अधिकारी, कार्यकारी परिषदेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

MPKV, Rahuri
Cotton Market : कापसातील तेजी कायम

विखे म्हणाले, कृषी विद्यापीठात मुलींना प्रवेश मिळत नव्हता. त्यासाठी मी कृषिमंत्री झाल्यानंतर तीस टक्के जागा मुलींसाठी आरक्षित केल्या. स्पर्धातून संधी आपोआप चालून येते. कलेला कोणतीही मर्यादा नसतात. मात्र अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे महोत्सव होईनात. स्नेह, प्रेम, जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी व्यासपीठे राहिली नाहीत. देशात आणि जगात कृषी क्षेत्राने भरारी घेतली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून शेतकरी, उद्योजकांना नवी ऊर्जा सातत्याने मिळत आहे. शेतीसाठी ड्रोनचा वापर वाढू लागला आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे. महसूल विभागानेही ड्रोनचा वापर अधिक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे विखे यांनी सांगितले.  

कार्यक्रमाआधी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. त्यात महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. राज्यासह इतर सर्व २२ विद्यापीठांतून ११०० विद्यार्थी सहभागी झाल्या आहेत. आज (ता. ९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप व बक्षीस वितरण होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com