जळगाव : जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Gram Panchayat Election) सरपंचपदासाठी (Sarpanch) २७९, तर सदस्यपदासाठी १०१३, अशा एकूण १,२९२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची लढत स्पष्ट झाली आहे. उमेदवारांना चिन्हाचे वाटप सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
जिल्ह्यात १,२०८ जागांसाठी ३,२०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, तर ५२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. बुधवारी (ता. ७) माघारीची अंतिम मुदत होती. इच्छुकांनी अनेकांना माघारीसाठी आणल्याचे चित्र तहसील कार्यालयात पाहावयास मिळाले. जिल्ह्यात १४० ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.
१४० ग्रामपंचायतींमधील एक हजार २०८ जागांसाठी तीन हजार २७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर सरपंचपदाच्या १४० जागांसाठी ६७१ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सोमवारी (ता. ५) छाननीत सदस्यपदांचे ४५, तर सरपंचपदाचे सात, असे एकूण ५२ अर्ज बाद ठरविण्यात आले होते.
आतापर्यंत जळगाव तालुक्यात दोन, तर अमळनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सुजदे, सावखेडा खुर्द (ता. जळगाव), ब्राह्मणे, निमझरी (ता. अमळनेर), सावखेडा मराठे (ता. पारोळा), अटवाडे (ता. रावेर) यांचा सामावेश आहे. ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
तालुका ग्राम-पंचायती उमेदवार सदस्य-पद
अमळनेर २४ २९५ ५९
भडगाव ६ ११७ १७
भुसावळ ६ १२४ २३
बोदवड ५ ५९ १९
चाळीसगाव १६ ३११ ४८
चोपडा ५ ६७ ९
धरणगाव ७ ७६ १५
एरंडोल ६ ८३ ११
जळगाव १२ १४८ ३३
जामनेर १२ २०९ ३०
मुक्ताईनगर २ ६८ ७
पारोळा ९ ११२ १९
रावेर २२ ३५१ ५७
यावल ८ १५९ २९
एकूण १४० २१७९ ३७६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.