Gokul Dudh Sangh News Updates: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) शासकीय प्रशासक नियुक्तीची मागणी भाजप समर्थक चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी लावून धरली आहे. तर दुसरीकडे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी, 'गोकुळ'ची निवडणूक प्रक्रिया सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावा केला आहे. यामुळे गोकुळ दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती की निवडणूक? हे लवकरच स्पष्ट होईल..''आम्ही पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी तसेच सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासकीय प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी केली होती. या भूमिकेला न्याय देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत झाला आहे. दूध संघावर आएएएस दर्जाचा अधिकारी प्रशासक म्हणून नेमला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे,'' असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. .आमचा विरोध प्रामाणिक दूध उत्पादक शेतकरी सभासद अथवा नियमानुसार सर्व तालुक्यांना आवश्यक असणाऱ्या आणि नियमानुसार स्थापन संस्थांना नाही. तर राजकीय स्वार्थाने नियमबाह्य पद्धतीने संस्था स्थापन करून त्यांचा वापर गैरकारभारासाठी करणाऱ्या प्रवृतीला आहे, असे आमदार पाटील यांनी नमूद केले आहे..Gokul Milk Union: चोख कारभार केल्यामुळे गोकुळ दुध संघाची प्रगती.भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही दबाव आणणार का?, आमदार पाटील यांचा सवालतुमचा कारभार प्रामाणिक आणि पारदर्शक असेल तर तुम्ही इतके हतबल का झालात?. दूध संघातील भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही दबाव आणणार का?, असे सवाल आमदार शिवाजी पाटील यांनी मुश्रीफ यांना उद्देशून केले आहेत. बेकायदेशीर संस्थांच्याबाबतीत निर्णय घ्या, आम्ही महायुती म्हणून एकत्र लढू, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. .'गोकुळ'वर प्रशासक नेमण्याची मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान 'गोकुळ'वर प्रशासक नेमण्याबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. गोकुळ संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपणार आहे. त्याआधी राजकीय हालचाली वेगाने सुरु आहेत..Gokul Milk Price: ‘गोकुळ’ म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये, गाय दूध खरेदी दरात २ रुपये वाढ.गोकुळवर प्रशासक नेमण्यास विरोधदरम्यान, गोकुळवर प्रशासक नेमण्यास शिवसेना, राष्ट्रवाद आणि जनसुराज्य पक्षाचा विरोध आहे. याबाबत मुंबईत मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील- यड्रावकर, शिवाजी पाटील, गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, संचालिका सौ. शौमिका महाडिक आणि समित कदम यांची उपस्थिती होती. .नाविद मुश्रीफ यांनी काय म्हटले?मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना सर्वांना दिल्या असल्याचे नाविद मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, २८ एप्रिल रोजी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत महायुतीमधील सर्व नेत्यांची तास ते दीड तासभर व्यापक बैठक झाली. या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्याबाबत सविस्तर चर्चा झाली. .'अफवांवर विश्वास ठेवू नका'कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ४ मे २०२६ रोजी ही सर्व परिस्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे, त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.