Crop Diversification: खरीप हंगाम २०२६-२७च्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड या तीन तालुक्यांसाठी कृषी विभागाने सविस्तर नियोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पारंपरिक पिकांसोबत मसाला पिकांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. बियाणे, खते, पीक कर्ज आणि विमा योजनांची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली..अंबरनाथ पंचायत समिती सभागृहात झालेल्या तालुकास्तरीय खरीप पूर्व आढावा बैठकीत या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. अंबरनाथचे तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर यांनी बियाणे उपलब्धता, खते पुरवठा, पीक कर्ज वितरण आणि पीक विमा योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तर मुरबाडचे संदीप केणे आणि कल्याणचे कृषी अधिकारी कांबळे यांनी त्यांच्या तालुक्यांतील तयारी मांडत आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले..Turmeric Cultivation: हळद लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी कशी करावी?.बैठकीत आमदार कथोरे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत काळी मिरीसारख्या मसाला पिकांकडे वळावे, असे आवाहन केले. उत्पन्नवाढीसाठी पीक विविधीकरण आवश्यक असून कृषी विभागाने यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या..Dhaincha Cultivation: उष्णतेत धैंचाची मागणी वाढली.या वेळी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी; पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली ही पूर्वतयारी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले..सुरम लागवडीला प्राधान्यजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सुरण लागवड योजना’ला यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांतील १४९ शेतकऱ्यांना सुमारे ७४५ क्विंटल सुरण बियाण्यांचे अनुदानित वाटप करण्यात आले असून १४.९ हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे.या योजनेसाठी अंदाजे ६९.६ लाख रुपयांचा निधी खर्च होणार असून शहापूर तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.