Turmeric Farmer Issues: हिंगोली जिल्ह्यत भविष्यात हळदीच्या कमी दराचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी शेतकरी, शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि हळद व्यापारी यांची व्यापक बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची सोमवारी (ता.२७) भेट घेऊन केली..वायदे बाजारात प्रति क्विंटल १६ हजार ५०० रुपये असताना हिंगोली जिल्ह्यात हळदीचे दर प्रति क्विंटल १२ हजार ते १३ हजार रुपये आहेत. कमी दराने हळदीचे लिलाव पुकारण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा नुकसान होत आहे. .Turmeric Price Issue: हळदीचे दर 'जैसे थे'; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ.हिंगोली जिल्ह्यातील खासगी बाजारामध्ये सुद्धा हळदीला प्रति क्विंटल १० ते १२ हजार रुपये दर देत हळद उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जात आहे. मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने या प्रश्नाचे गांभीर्य अधिक वाढले आहे..Turmeric Procurement: शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने बुलडाण्यात हळद खरेदी.या सर्व पार्श्वभूमीवर वसमत येथील एनसीईडिएक्सचे वेअर हाऊसमधील हळदीची तत्काळ ऐफएसएसएआय किंवा इतर केंद्रीय एजन्सी मार्फत तपासणी करण्यात यावी. कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात हळदीचे एनसीसीएल मार्फत झालेले सर्टिफिकेशनची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले..यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे (नांदेड), रावसाहेब अडकीणे (हिंगोली), तानाजी भोसले, स्वाभिमानी पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष माधव पाटील गाढे,डॉ.रमेश शिंदे,तालुकाध्यक्ष जुनेद पठाण,पुष्पक देशमुख, ऋषीकेश देशमुख,सीताराम जाधव, गजानन मुनदर, मोहन मुनदर, हळद उत्पादकशेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.