Chana Disease Agrowon
ताज्या बातम्या

Chana Wilt Disease : हिंगोली, परभणी जिल्ह्यांत हरभऱ्यावर ‘मर’चा प्रादुर्भाव

हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक भागांत यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक भागांत यंदाच्या रब्बी हंगामातील (Rabi Season) हरभरा पिकावर मर रोगाचा (Chana Wilt Disease) प्रादुर्भाव आढळून येत आहे. परिणामी पीक विरळ होत आहे. एकरी झाडांची संख्या कमी झाल्यामुळे उत्पादनात (Chana Production) घट येते. नुकसान टाळण्यासाठी या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

यंदा हिंगोली, परभणी जिल्ह्यांत २ लाख ३२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांमार्फत होणारा बुरशीचा प्रादुर्भाव थांबू शकतो.

परंतु माती तसेच हवेमार्फत बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पिकास जास्तीचे पाणी देणे टाळावे. जमीन वाफसा स्थितीत ठेवावी, असे कृषिविद्या विशेषज्ञ राजेश भालेराव म्हणाले.

...अशी घ्या काळजी

उथळ किंवा खोल पेरणी करणे टाळावे.

सातत्याने एकाच ठिकाणी कडधान्याची पेरणी करणे टाळावे.

प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पिकांचा फेरपालट करावा

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी

शिफारसीत असलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा

मर रोगग्रस्त झाडे उपटून फेकून द्यावी

हरभऱ्यामध्ये १० ते १५ टक्के मर आढळून येत आहे. गावातील बीजप्रक्रिया न केलेल्या हरभरा पिकांमध्ये ‘मर’चे प्रमाण तुलनेने अधिक आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येईल.
राहुल कव्हर, ताकतोडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: दिवाळी उलटून गेल्यानंतरही सोयाबीन खरेदीचा घोळच

Cotton Rate: सेलू बाजार समितीत पाडव्याला कापसाला सरासरी ७१५० रुपये दर

Crop Damage: शेतात पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान

Soybean Rate: बाजारात ‘पांढऱ्या’पाठोपाठ ‘पिवळे सोने’ही काळवंडले

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’मध्ये राज्यात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT