Team Agrowon
हरभरा पिकात पेरणीपूर्वीचे ओलीत व त्यानंतर वाढीची अवस्था आटोपल्यानंतर कळी अवस्थेच्या सुरुवातीला ओलीत द्यावे.
स्प्रिंकलरचा वापर करताना जमिनीच्या प्रकारानुसार आणि ओलीची स्थिती पाहून पाण्याच्या पाळीची वेळ ठरवावी.
स्प्रिंकलर किती वेळेसाठी लावायचे, हे ठरवावे. अन्यथा बुरशीजन्य मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
गरज भासल्यास घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला ओलित द्यावे. या वेळी सुद्धा जमिनीतील ओलीनुसार निर्णय घ्यावा.
शेंडे खुडल्यामुळे अवास्तव वाढ टाळता येते. अथवा पेरणीपासून साधारणत: २७ ते ३२ दिवसांनी मशिनच्या साह्याने पिकाचे शेंडे छाटून घ्यावेत.
हरभरा पिकावर घाटेअळी ही मोठी समस्या ठरते. घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिकाचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे.
हरभऱ्याचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी, पिकाच्या उंचीपेक्षा ४ ते ५ फूट अधिक उंचीचे पक्षिथांबे एकरी १२-१५ प्रमाणात उभारावेत.