Farmer Suicide Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी काम करणार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार; संयुक्त संशोधन परिषद, कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

Team Agrowon


दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. कृषिमंत्रीपदाचा कार्यकाळ दोन वर्ष आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) थांबल्या पाहिजेत, यासाठी काम करणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्यापारी तत्त्वे शिकवणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन परिषद व कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी सत्तार बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्यासह अन्य विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करण्यात आली आहे. मीही सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आहे. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात शेतकऱ्यांचा सन्मान करणारे हे पहिले सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा उत्तम सन्मान केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रस्तावित केलेल्या सगळ्या योजनांना मान्यता देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.’’

‘‘कोकणातील काजू आणि आंब्याला २०० कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. गोव्याच्या धर्तीवरती कोकणातील आंबा, काजू बागायतदारांना अनुदान देण्याची योजना आणण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा योग्य पद्धतीने सन्मान केला जाईल,’’ असेही सत्तार म्हणाले.


‘नवीन वाणांवर उद्या शिक्कामोर्तब’
‘‘दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात आयोजित प्रदर्शनात अडीच तासांत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन त्यांनी केलेले काम आपण पाहिले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी संयुक्त संशोधन परिषदेत शिफारस केलेली संशोधने, नवीन शोधून काढलेल्या जाती व नवीन वाण यावर अंतिम शिक्कामोर्तब उद्या (ता.१६) होईल,’’ असेही सत्तार यांनी सांगितले.


‘नवीन वाणांवर उद्या शिक्कामोर्तब’
‘‘दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात आयोजित प्रदर्शनात अडीच तासांत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन त्यांनी केलेले काम आपण पाहिले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी संयुक्त संशोधन परिषदेत शिफारस केलेली संशोधने, नवीन शोधून काढलेल्या जाती व नवीन वाण यावर अंतिम शिक्कामोर्तब उद्या (ता.१६) होईल,’’ असेही सत्तार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: सक्तीच्या वसुली विरोधात शेतात फडकवले काळे झेंडे

Kalmana APMC: कळमना ‘एपीएमसी’ची ‘एसआयटी’ चौकशी अवैध

Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अतिवृष्टीने पिके मातीमोल

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल

Sugar Recovery Theft: इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय

SCROLL FOR NEXT