Nadi Samvaad yatra Agrowon
ताज्या बातम्या

Nadi Samvaad yatra : नदी संवाद यात्रेतून प्रदूषण रोखणार : पवार

प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर नदी, नाले, ओढे, तलाव यामध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी केले.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सातारा : पृथ्वीवर तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वाटप करणे ही आता काळाची गरज आहे, नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नद्यांचे प्रदूषण व उपाययोजना करण्याचा शासनाचा मानस आहे. प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर नदी, नाले, ओढे, तलाव यामध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी केले.

‘चला जाणूया नदी’ अभियानांतर्गत वेण्णा नदी संवाद यात्रेचा समारोप सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कृष्णा नदी समन्वय प्रदीप पाटणकर, क्षेत्र माहुलीच्या सरपंच नूतन साळुंखे, श्रीराम हायस्कूलच्या मुख्याध्यापक निर्मला जगदाळे यांच्यासह सिंचन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. समारोपप्रसंगी जनजागृतीपर प्रभात फेरी आणि वेण्णा नदी जलपूजन करण्यात आले.

श्री. पवार म्हणाले, ‘‘सिंचन विभागाच्या पाटांमध्ये काही नागरिक कचरा टाकतात. या पाटांमधील पाणी पिण्याबरोबर शेताच्या सिंचनासाठी वापरले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या पालकांमध्ये कचरा निर्मूलनाचे महत्त्व सांगितले पाहिजे.’’ या वेळी कृष्णा नदी समन्वयक श्री. पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र यादव यांनी प्रास्ताविक, तर पूजा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra : केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी घेतला नुकसानीचा आढावा; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

Scientific Onion Storage: शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक

Summer Crop Sowing: तीन जिल्ह्यांत २४ हजार८६२ हेक्टरवर पेरणी

Fodder Availability: मुबलक चाऱ्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली

Agro Input Dealers Association: दोषांची जबाबदारी उत्पादकांवर असावी: ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

SCROLL FOR NEXT