Sowing Progress: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागाचे उन्हाळी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५३ हजार ३७३.९७ हेक्टर असून आजपर्यंत सुमारे २४ हजार ८६२.६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ते ४६.५८ टक्के आहे..जिल्हानिहाय पेरणी स्थितीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उन्हाळी पिकाखालील सरासरी क्षेत्र १४ हजार ९०३.३६ हेक्टर असून, आजपर्यंत ७२९८.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, जी सरासरीच्या ४८.९७ टक्के आहे.उन्हाळी मका: सरासरी पेरणी क्षेत्र ४२९८.३५ हेक्टर असून प्रत्यक्षात ३२८४.१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ती सरासरीच्या ७६.४० टक्के आहे..Summer Groundnut Sowing: उन्हाळी भुईमुगाची पावणेअकरा हजार हेक्टरवर पेरणी.उन्हाळी ज्वारी: सरासरी पेरणी क्षेत्र २५३.८८ हेक्टर असून प्रत्यक्षात २९१.०० हे क्षेत्रावर पेरणी झाली.ती सरासरी क्षेत्राच्या ११४.६२ टक्के आहे.उन्हाळी बाजरी : सरासरी पेरणी क्षेत्र ५५५२.८० हेक्टर असून प्रत्यक्षात ३०३३.५० हे क्षेत्रावर पेरणी झाली. ती सरासरी क्षेत्राच्या ५४.६३ टक्के आहे.उन्हाळी भुईमुग: सरासरी पेरणी क्षेत्र १००८.४३ हेक्टर असून प्रत्यक्षात ५८५.०० हे क्षेत्रावर पेरणी झाली. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या ५८.०१ टक्के आहे..जालना जिल्हाजिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १९ हजार २८४.६८ हेक्टर असून आजपर्यंत ३८४४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १९.९३ टक्के इतकी आहे.उन्हाळी मका : सरासरी पेरणी क्षेत्र ३६२८.७२ हेक्टर असून अखेर १२०५.०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती सर्व साधारण क्षेत्राच्या ३३.२१ टक्के आहे..Summer Crop Sowing: मराठवाड्यात ४३ हजार ८४२ हेक्टरवर उन्हाळी पेरणी.उन्हाळी ज्वारी : सरासरी पेरणी क्षेत्र ९ हेक्टर असून ४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ती सर्व साधारण क्षेत्राच्या ५११.११ टक्के आहे.उन्हाळी बाजरी : सरासरी पेरणी क्षेत्र २६२१.६७ हेक्टर असून सुमारे २४७१हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ती ९४.२५ टक्के आहे.उन्हाळी भुईमूग : सरासरी पेरणी क्षेत्र १२९८.१४ हेक्टर असून ९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ती सर्व साधारण क्षेत्राच्या ७.४७ टक्के आहे..बीड जिल्हाजिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १९ हजार १८५.९३ हेक्टर असून आजपर्यंत १३७२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ती ७१.२१ टक्के इतकी आहे.उन्हाळी मका : सरासरी पेरणी क्षेत्र १९२५.६५ हेक्टर असून ९२३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ती सर्व साधारण क्षेत्राच्या ४७.९३ टक्के आहे. वाढीच्या अवस्थेतील पीक प्रामुख्याने चारा पीक म्हणुन घेतले जाते..उन्हाळी ज्वारी : उन्हाळी ज्वारी पिकाचे जिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र १०० हेक्टर असून सुमारे २० हेक्टरवर पेरणी झाली. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या २० टक्के आहे.उन्हाळी बाजरी : सरासरी पेरणी क्षेत्र ८९८६.७० हेक्टर असून आजअखेर १० हजार २४१हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती सर्व साधारण क्षेत्राच्या ११३.९६ टक्के आहे.उन्हाळी भुईमूग : सरासरी पेरणी क्षेत्र ३२४०.०५ हेक्टर असून आजअखेर १५४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती सर्व साधारण क्षेत्राच्या ४७.८१ टक्के आहे..पेरणीचा आढावाविभागीय सरासरी क्षेत्र : ५३,३७३.९७ हेक्टरएकूण पेरणी : २४,८६२.६० हेक्टर (४६.५८%).जिल्हानिहाय स्थितीछत्रपती संभाजीनगर : ७,२९८.६० हेक्टर (४८.९७%)जालना : ३,८४४ हेक्टर (१९.९३%)बीड : १३,७२० हेक्टर (७१.२१%).दृष्टीक्षेपात पेराबीड जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीजालना जिल्ह्यात पेरणीचा वेग मंदकाही ठिकाणी ज्वारी व बाजरीची पेरणी सरासरीपेक्षा जास्त.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.