Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात पाऊस पडणार का?

भारतीय हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

Team Agrowon


पुणेः राज्यात आज सकाळपासून अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान (Cloudy Weather) होते. भारतीय हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तर उद्याही काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होऊन शकतो, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवस तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता व्यक्त केली. तर देशातील अनेक भागांमध्ये आज किमान तापमानात वाढ झाली होती. तर राजस्थानमधील चुरु येथे सर्वात किमान ५ डिग्री तापमानाची नोंद झाली. तर गुजरातमधली बुलसर येथे सर्वाधिक कमाल ३५.५ डिग्री तापमान नोंदले गेले.

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. राज्यातील पुणे, सातारा, नगर, नाशिक, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तर बीड, जालना, परभणी, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती.

उद्या पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. राज्यातील अनेक ठिकाणी आज सकाळपासून अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान होते. आज मराठवाडा, विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त होते.

दरम्यान, सध्या किमान तापमानात वाढ दिसून येत असली तरी पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान कमी होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढू शकतो, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प

Marathwada Rain: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत हलका ते दमदार पाऊस

Okra Farming: भुसावळात प्रसिद्ध मयूरभाऊंची भेंडी

Desi Cucumber Seeds: अनेक वर्षांपासून जोपासलेले देशी काकडीचे बियाणे

Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार

SCROLL FOR NEXT