Maharashtra Weather Update agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : गणपतीत पाऊस धुमाकूळ घालणार?, बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता

Monsoon Rain : बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Rain Update : मागच्या दोन दिवसांपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण आणि विदर्भातील काही भाग सोडला तर पावसाने म्हणावा तसा वेग घेतला नाही. दरम्यान कालपासून पुन्हा पाऊस गायब झाला आहे. परंतु पुढच्या आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

मुंबईसह उपनगरात सलग तीन दिवस पाऊस होता परंतु कालपासून अचानक पाऊस बंद झाला आहे. १८ सप्टेबरपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात सलग दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येण्याची स्थिती आहे.

अशा स्थितीत कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या वायव्य दिशेकडे भू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळे १५ सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे २३ सप्टेंबरपर्यंत राज्यात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

१७ ते २३ सप्टेंबर दरम्यान दाट पावसाची शक्यता आहे. पहिली चक्रिय वाऱ्याची स्थिती १२ सप्टेंबरला तयार होण्याची शक्यता जाणवते, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी माध्यमांना दिली.

मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस उद्यापर्यंत काही भागात असणार आहे. दरम्यान कोकणात मात्र पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी केवळ मध्यम पावसाची शक्यता आहे.

संपूर्ण कोकणात जोरदार तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या ५ जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्री भागात पाऊस असेल असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT