Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : वन्यप्राण्यांनाही पाणीटंचाईच्या झळा

उन्हाच्या झळांमुळे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर होत आहे. यातून जंगलात राहणारे प्राणीही वाचू शकलेले नाहीत.

Team Agrowon

Water Shortage Alibaug उन्हाच्या झळांमुळे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर होत आहे. यातून जंगलात राहणारे प्राणीही (Wild Animal) वाचू शकलेले नाहीत. जिल्ह्यात कर्नाळा पक्षीअभयारण्य आणि फणसाड अभयारण्य आहेत, यासह जंगलाने व्यापलेल्या क्षेत्रही मोठे आहे. जलस्रोत आटू लागल्याने वन विभागाने परिसरात स्वच्छतेसह कृत्रीम पाणवठे तयार केले आहेत.

उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटतात, यामुळे मे-जून महिन्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते, याचा सर्वाधिक फटका प्राण्यांना बसतो. घशाला कोरड पडत असल्‍याने प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्‍तीत शिरतात.

यात काही प्राण्यांची शिकार केली जाते. तर बिबट्यासारख्या हिंस्र पशू माणसांवर हल्‍लेही करतात. त्‍यामुळे वनविभागाकडून वन्यजीवांसाठी जलस्रोत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. वनरक्षकांकडून नैसर्गिक पाणवठ्यांसह नाले व कृत्रिम तलावांच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे.

गवत खाणाऱ्या प्राण्यांना सर्वाधिक फटका

सह्याद्रीच्या पट्ट्यात रानडुक्कर, तरस, सांबर, भेकर, ससे, कोल्हे, बिबट्यांचा वावर जास्त आहे. पाण्याच्या शोधात पक्षी काही किलोमीटरचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतात, परंतु पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका प्राण्यांना बसतो. सुके गवत खाल्ल्‍यावर तहान भागवण्यासाठी लोकवस्तीत प्राणी शिरतात.

पाण्यासाठी वणवण थांबणार

पाण्यासाठी वन्यजीव भटकंती करीत असल्‍याने, कधी कधी रस्ते ओलांडताना किंवा मानवी वस्तीत प्रवेश केल्याने त्यांना जीवही गमवावा लागतो. अनेक वेळा तहानेने व्याकूळ झालेले प्राणी विहिरीत पडण्याच्याही घटना घडल्‍या आहेत.

फणसाड वनक्षेत्रात पाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत आहेत. त्‍यांची साफसफाई करून प्राण्यांना पुरेसा पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी पाणवठे पूर्णपणे आटले आहेत, त्या ठिकाणी सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

पाण्यासाठी वणवण थांबणार

पाण्यासाठी वन्यजीव भटकंती करीत असल्‍याने, कधी कधी रस्ते ओलांडताना किंवा मानवी वस्तीत प्रवेश केल्याने त्यांना जीवही गमवावा लागतो. अनेक वेळा तहानेने व्याकूळ झालेले प्राणी विहिरीत पडण्याच्याही घटना घडल्‍या आहेत.

फणसाड वनक्षेत्रात पाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत आहेत. त्‍यांची साफसफाई करून प्राण्यांना पुरेसा पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी पाणवठे पूर्णपणे आटले आहेत, त्या ठिकाणी सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT