Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Rain Update : अखेर महिन्यानंतर तहानलेल्या भुईवर आभाळमाया

Latest Rain News : गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरा जवळपास वाया गेला. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला.

Team Agrowon

Nashik News : गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरा जवळपास वाया गेला. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तर शेतकरी अडचणीत सापडले होते. अखेर एक महिन्यानंतर तहानलेल्या भुईवर आभाळमाया झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यात गुरुवारपासून (ता. ७) संततधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार ९ सप्टेंबर जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. तर १० ते १३ सप्टेंबर दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नाशिक, निफाड तालुक्यांत पावसाचा जोर दिसून आला.

तर सटाणा, नांदगाव, येवला व मालेगाव या तालुक्यांत पावसाने सर्वदूर हजेरी लावली; मात्र जोर कमी होता. पूर्व भागातील तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्रंबकेश्वर, वेळुंजे, हरसूल, ठाणापाडा, दहाडेवाडी या सर्वच महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. ज्यामध्ये दहाडेवाडी मंडलात सर्वाधिक ११७ मिमी पावसाची नोंद झाली. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणा बोरगाव व सुरगाणा या तीन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

पावसामुळे दिंडोरी, देवळा तालुक्यातील छोट्या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. प्रामुख्याने दिंडोरी चांदवड या भागात धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणे वाढ झाली. तर अनेक ठिकाणी लहान नद्यांनाही पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पाचा संकल्पित पाणीसाठा ६५ हजार ६६४ दलघफू इतका आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार धरणात शुक्रवारी (ता. ८) ४४ हजार ३६० दलघफू इतका झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७ धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला.

धरणातून विसर्ग सुरू (ता. ८ रोजी सायं. ५ वाजता)

धरण विसर्ग(क्युसेक्स)

गंगापूर २,०८०

आळंदी २८०

कडवा ३,८१४

पालखेड ५,९२४

चनकापुर ३३,०४५

पुनंद १६,३८६

हरणबारी ५,०००

पुनेगाव ८९०

नांदूर मधमेश्वर ४,८४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT