Rain Update Kolhapur
Rain Update Kolhapuragrowon

Rain Update Kolhapur : खरीप पिकांना दिलासा, पूढचे दोन दिवस पावसाची शक्यता

Kolhapur Rain Alert : कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली.
Published on

Weather Update Kolhapur : मागच्या कित्येक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मागच्या २४ तासांत दिलासादायक हजेरी लावली. याचबरोबर पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान मागच्या २४ तासांत जिल्ह्यात विविध भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना उभारी मिळाली आहे. भात, भुईमूग, उसासह इतर पिके धोक्यात आली होती. अशा परिस्थिती जोरदार पावसाची पिकांना गरज होती.

याशिवाय, उन्हाचा तडाखाही जोरदार वाढल्याने पिके करपण्याच्या अवस्थेत होती. दरम्यान कालपासून जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने भात, नाचणी पिकांना चांगली उभारी मिळाली आहे.

तसेच करवीर, कागल, हातकणंगले तालुक्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे माळरानातील भात, सोयाबीन, मूग, सूर्यफूल, भुइमूगासह इतर पिकांना आधार मिळाला आहे. शिरोळ तालुक्यात मात्र अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने वीजपंपाद्वारे पाणी द्यावे लागत आहे.

Rain Update Kolhapur
Kolhapur Kharif Season : खरीप पिकांना धोका! धरणांच्या पाण्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्र्यांनी केल्या सूचना

दरम्यान पोटरी पडत आलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. मागच्या दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने पोटरीला आलेल्या पिकांना झटका बसण्याची भिती होती. ऐन गरजेच्या वेळीच मुळांना पाणी नसल्याने भात व अन्य पिके बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मध्यरात्रीपासून पावसाने दमदार सुरुवात केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी धरणक्षेत्रात २४ तासात ५५ मिलिमीटर तर कोदे धरणक्षेत्रात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुंभी मध्यम प्रकल्प क्षमतेच्या ९८.५३ टक्के भरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com