Bhimashankar Temple Agrowon
ताज्या बातम्या

Bhimashankar : श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या पायरी मार्गाचे होणार रुंदीकरण

विकास आराखड्यातील ०.२८७ हेक्टर वनजमीन वळतीकरणास मान्यता

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : श्रीक्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar) विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी भोरगिरी (ता. खेड) आणि निगडाळे (ता. आंबेगाव) येथील ०.२८७ हेक्टर वनजमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे,

अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रा. य. पाटील यांनी दिली आहे.

राखीव वन क्षेत्रांतर्गत भोरगिरी येथील गट क्रमांक १३० (सी. नं. २०१ क्षेत्र ०.०८४ हेक्टर) आणि निगडाळे येथील गट क्रमांक २४४ (सी. नं. २०० ए-क्षेत्र ०.१६८, ०.०२० व ०.०१५ हेक्टर) अशी एकूण ०.२८७ हेक्टर वनजमीन वळतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वळतीकरणास मान्यता देताना पुढील अटी व शर्ती राहणार आहेत.

प्रकल्प यंत्रणा वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन केल्याची उपवनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी खात्री करावी. अधिनियमातील अटींचे पालन न करणाऱ्यांवर वैधानिक कारवाई करण्यात येणार आहे.

कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये. मजुरांच्या वास्तव्यासाठी वनक्षेत्रात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येऊ नये. हा मान्यता आदेश एक वर्षापर्यंत वैध राहणार असल्याचे रा. य. पाटील पाटील यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT