Bhimashankar: भीमाशंकर येथे भाविकांची गर्दी

श्रावण महिन्यात भीमाशंकर मंदिरातील (Bhima shankar Temple) पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाबरोबरच येथील शनी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, कमलजा देवी मंदिर या प्राचीन मंदिरे देखील पहावयास मिळतात.
Bhimashankar Temple
Bhimashankar TempleAgrowon
Published on
Updated on

फुलवडे, जि. पुणेः बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhima shankar Temple) येथे श्रावण महिना सुरू झाल्याने दर्शनासाठी तसेच वर्षा विहारासाठी राज्यभरातून भाविक व पर्यटक याठिकाणी येत असतात. कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच मंगलमय वातावरणात यात्रा भरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

श्रावण महिन्यात भीमाशंकर मंदिरातील (Bhima shankar Temple) पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाबरोबरच येथील शनी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, कमलजा देवी मंदिर या प्राचीन मंदिरे देखील पहावयास मिळतात.

पावसाळ्यातील थंड हवेचे ठिकाण, सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले घनदाट अभयारण्य, हनुमान तळे, भीमा नदीचे उगमस्थान, गुप्त भीमाशंकर, नागफणी यासारखी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पर्यटक नेहमी याठिकाणी गर्दी करतात.

घोडेगाव व खेड पोलिस ठाण्यांचा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून मद्यसेवन व हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करणार आहेत. बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिराजवळ व पायऱ्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, डॉग स्कॉड, हॅन्डमेटल डिडेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणा व मोठा पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com