ताज्या बातम्या

Water Conservation : बेंद ओढ्याचे रुंदीकरण-खोलीकरण पूर्ण

सोलापूर जिल्हा परिषद, नाम फाउंडेशन, मुकुल माधव फाउंडेशन पुणे या संस्थांनी बेंद ओढ्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या प्रकल्पासाठी आर्थिक मदत केली.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः माढा तालुक्यातील निमंगाव (टे) येथील माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या (Madha Welfare Foundation) वतीने हाती घेण्यात आलेल्या बेंद ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे (Bend Stream Winding And Dipping) काम पूर्ण झाले असून, सुमारे ३४.५ किलोमीटर लांब असणारा हा प्रकल्प राज्यातील सर्वात लांब आणि खोलीकरण, रुंदीकरण असणारा जलसंधारणाचा प्रकल्प ठरला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी दिली. (Water Conservation)

सोलापूर जिल्हा परिषद, नाम फाउंडेशन, मुकुल माधव फाउंडेशन पुणे या संस्थांनी बेंद ओढ्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या प्रकल्पासाठी आर्थिक मदत केली. आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे अनंत अडचणींचा सामना करीत प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याचे आपल्याला समाधान असल्याचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. बेंद ओढ्याचे ३४.५ किलोमीटर लांबीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यामुळे बारा गावांतील जवळपास ६२ हजारांहून अधिक एकर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ढवळस, चौभेपिंपरी, पिंपळखुटे, कुर्डू, कुर्डुवाडी, भोसरे, वडाचीवाडी, वेताळवाडी, रणदिवेवाडी, वडशिंगे, उंदरगाव, महातपूर या १२ गावांना याचा लाभ होणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न या प्रकल्पामुळे मार्गी लागला आहे. माढा वेल्फेअर फाउंडेशनमुळेच हे शक्य झाले. फाउंडेशनचे काम शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे.
श्रीकांत कोरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT