Nashik Onion Farmers agrowon
ताज्या बातम्या

Nashik Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकरी कोणामुळे अडचणीत? कोट्यावधीचं नुकसान, तरीही निर्णय नाही

Nashik Onion Auction : मागच्या ७ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत. व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लिलाव बंद केले आहे.

sandeep Shirguppe

Farmer Onion Auction : मागच्या ७ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत. व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लिलाव बंद केले आहे. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करुन विक्री रेशन दुकानातून करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी कांद्याचे लिलाव बंद आहेत. परंतु अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मागच्या ७ दिवसांपासून कांदा व्यापारी आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांसोबत बैठका होत आहेत परंतु व्यापारी आणि सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे तोडगा निघणे अशक्य झाले आहे. दरम्यान या सगळ्यात सरकार आणि व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणात शेतकरी भरडला जात आहे. नेते प्रतिक्रिया देतात परंतु कृती काहीच होत नसताना दिसून येत आहे.

कांदा लिलाव बंद असल्याने जवळपास ५० कोटींच्या घरात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच केंद्राने कांदा निर्यातीवर शुल्क आकारल्याने शेतकऱ्याला चार पैसै मिळणारे थांबल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तर दुसरीकडे पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना खरिप हंगामात मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. एकीकडे सरकारची कुचकामी धोरणे आणि व्यापाऱ्यांचा संपाने शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

छगन भुजबळ म्हणतात, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा सडत आहे. याबाबत शासन आणि नाफेडचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली आहे. तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहीती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यासंदर्भात मंत्री पियुष गोयल हे संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिगृहावर बोलणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

मनात आलं की संप करायचा हे चालणार नाही : अब्दुल सत्तार

कांदा व्यापारी अचानक संप करुन शेतकऱ्यांना वेटीस धरत आहेत.त्यांच्यामुळं शेतकऱ्यांचा कांदा सडायला लागला आहे. त्यामुळें आम्ही लवकरच या व्यापाऱ्यांवर निर्बंधासाठी नियमावली करत असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. मनात आलं की संप करायचा हे चालणार नाही असेही सत्तार म्हणाले. आम्ही मार्केटिंग फेडरेशनला उतरवून कांदा खरेदी करु, म्हणजे संप जरी व्यापाऱ्यांनी केला तरी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही.

केंद्राला कधी कोणता कांदा मार्केटमध्ये उतरवायचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफ कांदा मार्केटमध्ये उतरवन बंद करा ही मागणी मान्य होणारी नाही असंही सत्तार म्हणाले. पीयुष गोयल हे मुंबईत आहेत. त्यांना मी भेटणार आहे. ४० टक्के टॅक्स रद्द करावा ही मागणी आहे. व्यापारी फी एक रुपयांच्या ऐवजी ५० पैसे घ्यावी अशी मागणी आहे.

आज सात वाजता यावर निर्णय होणार असल्याचे सत्तार म्हणाले. आज सात वाजता यावर तोडगा निघेल. यावर निर्णय झाला नाही तर मार्केटींग फेडरेशन कांदा खरेदी करेल असे सत्तार म्हणाले. आम्ही चाळीवर जाऊन कांदा खरेदी करु असे सत्तार म्हणाले.

कांदा उत्पादकांचे नुकसान करण्याची शासनाची भूमिका : सुप्रिया सुळे

सध्या कांदा व्यापारी संपावर गेले आहेत. याबाबत शासनाने व्यापाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठका निष्फळ ठरत आहे. शासन सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. यावर्षी कमी पावसामुळे हातची पिकं गेली आहेत. दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर त्याला शासन विरोध करीत आहे, हे खेदजनक असल्याचे सुळे म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT