White Onion Production Agrowon
ताज्या बातम्या

White Onion Cultivation : रायगडमध्ये २७० हेक्टरवर पांढरा कांदा पीक

चविष्ट व औषधोपयोगी पांढऱ्या कांद्याला गेल्‍या काही वर्षांत मागणी वाढली आहे.

Team Agrowon

अलिबाग ः चविष्ट व औषधोपयोगी पांढऱ्या कांद्याला (White Onion Production) गेल्‍या काही वर्षांत मागणी वाढली आहे. अलिबागमधील पांढऱ्या कांद्याला विशेष पसंती असून, जिल्‍ह्यात पंधरा दिवसांपासून लागवड सुरू झाली आहे. भात कापणीची (Paddy Harvesting) कामे पूर्ण झाल्यावर शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड (White Onion Cultivation) करण्याच्या तयारीला लागले आहेत. अलिबाग तालुक्यात कांदा लागवडीच्या क्षेत्राचे प्रमाण जास्‍त आहे. यंदा २७० हेक्टर क्षेत्रात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्थानिक बाजारासह मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठी मागणी आहे. कांदा लागवडीतून २५ लाखांची उलाढाल होते. तालुक्यात कांद्याची लागवड सरासरी एक हजार एकर क्षेत्रामध्ये केली जाते. त्यात कार्ले, खंडाळे, तळवली, वाडगाव आदी १२ गावांचा समावेश आहे. या गावांतील बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात; तर रोहा तालुक्यात दोन ठिकाणी कांद्याची लागवड केली जाते.

कांदा लागवडीचे क्षेत्र वाढीसाठी बैठक व प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. बियाण्यांचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना अधिक लागवड करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्‍यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांमार्फत कार्यशाळा घेण्यात आल्‍या आहेत. गतवर्षी किडरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. यंदा तो होऊ नये, यासाठी कार्यशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्‍ह्यात कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT