पुणेः राज्यात सोमवारपासून सर्वदूर पावसाने हजेरी (Rainfall) लावली. बुधवारीही राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. कोकणातील वामोशी येथे सर्वाधिक २६० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. आज कोकणात धुव्वाधार पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली. तर मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार आणि राज्याच्या इतर भागांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.
बुधवारी दुपारपर्यंत कोकणात पावसाची संततधार सुरुच होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. तर आंबोली येथे २५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील धामनांद येथे २४५ मिलीमिटर पाऊस झाला. कोकणात सर्वंच तालुक्यात पावासाची रिपरिप सुरुच होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र जोर काहीसा कमी झाला. अनेक भागांतील शेतांत अद्याप पाणी साचलेले आहे. तर नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे वारणा नदीच्या पातळीत वाढ झाली. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांत थांबून थांबून पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाच्या सरी पडत आहेत. काडगाव मंडळात १५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुणे जिल्ह्यातही पावसाचा चांगलाच जोर वाढला. लोणावळ्यात १६६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. हवेली, मुळशी, मावळ, वेल्हा, खेड या तालुक्यांतील सर्वंच भागात जोरदार पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. महाबळेश्वर, पाटण, जावळी, सातारा तालुक्यांच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला.
विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी सुरु आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदीया, वाशीम या जिल्ह्यांतील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना आणि नांदेड जिल्ह्यांत बुधवारी दुपारपर्यंत पाऊस पडल्याची माहिती मिळाली.
तर आज म्हणजेच बुधवारी कोकणात धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात जोरदार तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.