Namo Shetkari Mahasanmanam scheme agrowon
ताज्या बातम्या

Namo Shetkari Mahasanmanam scheme : नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हफ्ता मिळणार तरी कधी?

Kolhapur Farmers : नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार ४३८ शेतकऱ्यांनी केवायसी आणि तत्सम प्रक्रिया पूर्ण केली आहे.

sandeep Shirguppe

Namo Shetkari Mahasanmanam scheme : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. परंतू सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना पहिला हफ्ता दिला नसल्याने याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार ४३८ शेतकऱ्यांनी केवायसी आणि तत्सम प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासाठी अद्यापही ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याने जिल्ह्यातील जवळपास लाखांच्या आसपास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पीएम किसानच्या धर्तीवर योजनेप्रमाणे राज्यातील महायुती सरकारनेही याच प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी 'नमो शेतकरी महा सन्मान निधी' योजनेची घोषणा शिंदे सरकारने केली.

पीएम किसान योजनेचे लाभार्थी राज्याच्या या नव्या योजनेचे लाभार्थी ठरतीलच, पण नव्या लाभार्थ्यांनाही या योजनेसाठी केवायसी आणि बँक खात्याला आधार लिंक करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या कृषी विभागाने केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीची घोषणा केली. त्यासाठी केंद्र सरकारने वीस हजार कोटी रुपयांची तरतूदही केली होती. ४ महिन्यांच्या अंतराने वार्षिक सहा हजार रुपये समान तीन हप्त्यांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील नमो किसान महासन्मान योजनेचे तालुकावार पात्र लाभार्थी राधानगरी (३२,३५०), भुदरगड (२५,८६९), करवीर (४८, ८५९), कागल (४०, ७४९), आजरा (२३,९१५), चंदगड (३२,९६६), गडहिंग्लज (३९,२०६), शिरोळ (३७,३०८), हातकणंगले (३९, ७३४), शाहूवाडी (२४,८८९), पन्हाळा (३५, ७९९)- गगनबावडा (५, ७९४) असे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

Cotton Crop Management: कपाशीच्या पातेगळच्या व्यवस्थापनासाठी उपाय

Dharashiv Rain : तीन दिवसांच्या पावसात सहाशे घरांची पडझड

SCROLL FOR NEXT