खानदेशात गव्हाच्या दरात सुधारणा Agrowon
ताज्या बातम्या

Wheat Rate : खानदेशात गहू दरात क्विंटलला २०० रुपये वाढ

खानदेशात गव्हाच्या दरात एक क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची सुधारणा झाली असून, कमाल दर २४९१ रुपयांपर्यंत पोचले आहेत. आवक घटत आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात गव्हाच्या दरात (Wheat Rate) एक क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची सुधारणा झाली असून, कमाल दर २४९१ रुपयांपर्यंत पोचले आहेत. आवक घटत आहे.


गव्हाची पेरणी (Wheat Sowing) अपेक्षेपेक्षा कमी होती. खानदेशात ३० हजार हेक्टरवर गहू पेरणीची अपेक्षा होती. परंतु पेरणी सुमारे २८ हजार हेक्टरवर झाली होती. कापूस पिकात नुकसान दिसत असल्याने अनेकांनी कापूस पीक काढून डिसेंबरअखेर गहू पेरणी केली.

यामुळे क्षेत्र २८ हजार हेक्टरवर पोचले. परंतु उत्पादन हवे तेवढे नाही. उत्पादन प्रतिएकर ११ ते १२ क्विंटल, असे येत आहे. यातच ४ ते ७ मार्च व त्यानंतर ९ ते १७ मार्च यादरम्यान झालेल्या पाऊस, वादळाने गहू पिकाचीदेखील हानी झाली आहे.

मळणी लांबली होती. मळणी पूर्ण होत आली आहे. परंतु उत्पादन कमी असल्याने आवकही घटली आहे. आवक मार्चअखेर वाढते, पण यंदा आवक मार्चअखेरही वाढलेली नाही. यामुळे दरात सुधारणा झाली आहे.

मार्चच्या मध्यात गव्हास प्रतिक्विंटल २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर व जळगाव आणि धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा बाजार समितीतही दर मार्चच्या मध्यापर्यंत कमीच होते. त्यात मागील तीन ते चार दिवसांत सुधारणा झाली आहे.

सोमवारी (ता.२७) चोपडा व अमळनेर बाजार समितीत मिळून १८०० क्विंटल गव्हाची आवक झाली.

‘लोकवन’ची आवक घटणार
जळगाव बाजार समितीतही सोमवारी सुमारे २०० क्विंटल गव्हाची आवक झाली. चोपडा येथे किमान २००० कमाल २४९१ व सरासरी २३१५ रुपये, अमळनेर येथे किमान २१८१ व कमाल २४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

जळगाव येथेही कमाल दर २५०० रुपये प्रतिक्विंटल, असाच होता. लोकवन प्रकारच्या गव्हास हे दर मिळत आहेत. गव्हाची आवक मागील पंधरवड्यात बऱ्यापैकी होती.

ती मागील तीन ते चार दिवसांत कमी झाली आहे. पुढे ही आवक आणखी कमी होईल, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT