Rabi season Agrowon
ताज्या बातम्या

Wheat Sowing : शेवगाव तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढणार

ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस कोसळल्याने रब्बी हंगामात मुबलक पाणी उपलब्ध झाले.

Team Agrowon

शहरटाकळी, जि. नगर : ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस (Rain) कोसळल्याने रब्बी हंगामात (Rabi season) मुबलक पाणी उपलब्ध झाले. यंदा शहरटाकळी, दहिगाव-ने परिसरात गव्हाचा पेरा वाढणार आहे. शेतकरी खरिपाच्या काढणीनंतर रोटा मारून रब्बी हंगामासाठी शेत तयार करून गव्हाची पेरणी (Sowing wheat) करत आहेत.

खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीननंतर कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केली. परतीच्या पावसाने सोयाबीनची काढणी सुरू असताना धुमाकूळ घातला. परिणामी सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने रब्बीत गहू, हरभरा आणि कांदा लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत.

गहू व कांद्याचे क्षेत्र सर्वाधिक असणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातात काही पडले नाही. नैसर्गिक आपत्ती, रोगराईमुळे मोठे नुकसान झाले. आता शेतकऱ्यांची उत्पन्नाची संपूर्ण भिस्त रब्बी हंगामावर अवलंबून आहे, असे देवटाकळी येथील शेतकरी संदीप खरड यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, मका आदी पिकांना शेतकऱ्यांना पाण्याची मात्रा देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा. रात्री-अपरात्री वीजपुरवठा होत असल्याने गैरसोय होत आहे.

- तुकाराम घोडखिंडे, शेतकरी, मठाची वाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT