Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात विजांसह पावसाची शक्यता

आज (ता. १०) दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

Team Agrowon

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, राज्यात असलेला कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Zone) यामुळे राज्यात विजा, मेघगर्जना, विजांसह पाऊस (Rain In Maharashtra) पडत आहे. आज (ता. १०) दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा (monsoon) आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, हा पट्टा जैसलमेर, उदयपूर, जळगाव, रामगुंडम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण कोकणापासून उपसागरातील कमी दाब प्रणाली पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे.

सकाळपासून वाढलेला उन्हाचा (Heat) चटका, उकाडा, दुपारनंतर वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पडणारा पाऊस असेच चित्र राज्याच्या विविध भागात दिसत आहे. आज (ता. १०) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार
---
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, आजपर्यंत (ता. १०) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT