Bacchu Kadu Agrowon
ताज्या बातम्या

Bachhu Kadu : आम्ही आता मंत्रिपदाच्या नेटवर्कबाहेर ः आमदार कडू

Bachhu Kadu Reaction On Cabinet Expansion : नुकत्याच झालेल्या खातेवाटपानंतर आम्ही मंत्रालयाच्या नेटवर्क बाहेर आहोत हे कळून चुकले आहे.

Team Agrowon

Amravati News : ‘‘गुजरात आणि त्यांनतर गुवाहाटीच्या बंडात सहभागावेळी आम्हाला देखील मंत्रिपद मिळेल, असे सांगण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या खातेवाटपानंतर आम्ही मंत्रालयाच्या नेटवर्क बाहेर आहोत हे कळून चुकले आहे.

आमच्या या पाऊल वाटेवर रेंजच नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल लागत नसावा. त्यामुळेच भविष्याचा विचार करून मुखमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ,’’ असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

कडू म्हणाले, ‘‘निधी वाटपावरून नाराज असल्याने या बंडात सहभागी झालो. परंतु आता अजित पवार यांना अर्थमंत्री पद मिळाल्याने पुन्हा तेच दिवस येतील की काय, अशी भीती आहे. शिवसेना आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ९० लाख असा निधी वाटपाचा असमतोल होता.

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला क्रिम खाती मिळाली आहेत. त्यातूनच ते दबाव टाकण्यात यशस्वी झाल्याचे सिद्ध होते. मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा वॉच राहिल्यास हा असमतोल राहणार नाही, असे वाटते.

बंडात सहभागी अपक्षांना देखील मंत्रिपद मिळेल, असे सांगण्यात आले होते. आता त्याचीही कोणतीच शाश्‍वती उरली नाही.’’

‘‘गेल्या पाच वर्षांत अशा घडामोडी कधी अनुभवल्या नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार रखडत ठेवण्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस होती, हे देखील स्पष्ट झाले. राष्ट्रवादी भाजपसोबत येणार हे आधीच माहिती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडविला’’, असेही कडू म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता; तीन शासन निर्णय प्रसिद्ध

Sugarcane Payment : उसाचे पैसे थकविल्याने शेतकऱ्यांचा संताप

Marathwada Rainfall : मराठवाड्यात अपेक्षेच्या तुलनेत पावसाची तूटच

Agriculture Scheme: बोअरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार ४० हजारांचे अनुदान

Tree Geo Tagging : सातारा जिल्ह्यात ५० लाख झाडांचे होणार जिओ टॅगिंग

SCROLL FOR NEXT