Bachchu kadu
Bachchu kaduAgrowon

Bachchu kadu : मंत्रिपदाची आशा सोडली ः बच्चू कडू

सरकारचे विद्यमान वीस मंत्री निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून नाहक नाराजी ओढवून घेण्याची गरज नाही.
Published on

नागपूर ः सरकारचे विद्यमान वीस मंत्री निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून नाहक नाराजी ओढवून घेण्याची गरज नाही.

त्यापेक्षा २०२४ मध्ये जो जिंकेल तो मंत्री होईल, असे सूचक वक्‍तव्य करीत आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी मंत्रिपदाची आशा सोडली. आमदार बच्चू कडू गुरुवारी (ता. १६) मुंबईवरून नागपुरात दाखल झाले.

त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे.

त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही हा विस्तार झाला नाही तर तो २०२४ च्या निवडणुकीनंतर निश्‍चित होईल.

Bachchu kadu
Bacchu Kadu : संत्रा उत्पादकांचे उभारणार फेडरेशन : बच्चू कडू

तसाही निवडणुकीला अवघा एक वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यातील सहा महिने या निकालाच्या मंथनात जातील. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी आमदारांची नाराजी ओढवून घेणारे परवडणार नाही. परिणामी २०२४ मध्ये जो जिंकेल तो मंत्री होईल.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मी कोणाशीही चर्चा केली नाही. माध्यमे विचारतात म्हणून मी बोलतो. मंत्रिमंडळ विस्तार माझ्या डोक्‍यातही नाही.

कारण मंत्री होण्यापेक्षा मला अपेक्षीत दिव्यांगांसाठीचे स्वतंत्र मंत्रालय प्रत्यक्षात आले याचा अधिक आनंद आहे. त्यामुळे मंत्री झालो नाही तर सेवक म्हणून नक्‍कीच काम करेल, असे कडू यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com