Water Storage
Water Storage Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Irrigation : खानदेशातील जलसाठा ५४ टक्क्यांवर स्थिर

Team Agrowon

जळगाव ः खानदेशातील जलसाठा (Water Storage) ५४ टक्क्यांवर स्थिर आहे. जळगावमधील गिरणा, हतनूर, वाघूर व धुळ्यातील अनेर, पांझरा या प्रकल्पांतून रब्बीसाठी (Rabi Irigation) दोन वेळेस आवर्तने सोडण्यात आले आहेत.

तिसरे आवर्तनही लवकरच सोडले जाईल. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीवरील (Girana River) गिरणा, वाघूर नदीवरील वाघूर आणि तापी नदीवरील हतनूर या प्रकल्पांतून अधिकाधिक क्षेत्र रब्बी हंगामात ओलिताखाली आणले जाते.

या तिन्ही प्रकल्पांत यंदा १०० टक्के जलसाठा होता. गिरणा धरणाची साठवण क्षमता १८.४२ टीएमसी आहे. या प्रकल्पातून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांत रब्बीसाठी पाणी देण्यात आले.

तसेच नदीमध्येही टंचाई निवारणार्थ दोन वेळेस पाणी सोडण्यात आले आहे. वाघूर प्रकल्पातून भुसावळ व जळगाव तालुक्यात एक दोनदा पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

या धरणाची साठवण क्षमता नऊ टीएमसी आहे. तसेच भुसावळनजीकच्या (जि.जळगाव) तापी नदीवरील हतनूर धरणातूनही दोन वेळेस रब्बीसाठी पाणी देण्यात आले आहे.

या प्रकल्पाची साठवण क्षमता सुमारे नऊ टीएमसी आहे. पण त्यात ५४ टक्के गाळ आहे. निम्मेपेक्षा कमी जलसाठा त्याचा वापरात येतो.

रावेर, यावल, चोपडा या तालुक्यांत त्यातून पाणी देण्यात आले आहे. तसेच वरणगाव (ता.भुसावळ) येथील आयुध निर्माणी, दीपनगर (ता.भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प आणि जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतही या प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जळगावमधील सर्व प्रकल्पांत मिळून ५६ टक्के जलसाठा आहे. तोंडापूर, सुकी, अभोरा, मंगरूळ, गूळ, बहुळा, अंजनी, अग्नावती, मन्याड, बोरी हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. त्यात मिळून ५८ टक्के जलसाठा आहे.

धुळ्यातील अनेर व पांझरा प्रकल्पातून अनुक्रमे चोपडा, शिरपूर, साक्री, धुळे, शिंदखेडा या तालुक्यांत रब्बीसाठी पाणी देण्यात आले आहे. पांझरा व अनेर प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. नंदुरबारमधील दरा, सुसरी प्रकल्पातही जलसाठा ६० टक्के एवढा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT