Bhandardara Dam Agrowon
ताज्या बातम्या

Bhandardara Dam Water Level Update : भंडारदरा धरण ९२ टक्क्यांवर

Bhandardara Dam : नळवंडे धरणातही पाणी येत असल्यामुळे ते लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. मुळा धरणात ७१.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील आदिवासी पट्ट्यात पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणातून केला जाणारा विसर्ग थांबवला आहे. विसर्ग थांबविल्यामुळे भंडारदरा धरणात शुक्रवारी (ता. ४) ९२ टक्के पाणीसाठा झाला. नळवंडे धरणातही पाणी येत असल्यामुळे ते लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. मुळा धरणात ७१.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व भागात गेल्यात चार-पाच दिवसांपासून पाऊस थांबलेला आहे. मात्र अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी डोंगर पट्ट्यात जोर कमी असला तरी पाऊस सुरूच आहे. भंडारदरा धरणात मागील आठवड्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत होती. त्यामुळे ८३ टक्के पाणीसाठा स्थिर ठेवून भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू केला होता.

आता विसर्ग बंद केला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात भर पडत असून, आज धरणाचा पाणीसाठा सव्वा दहा टीएमसी म्हणजे ९२ टक्के झाला आहे. दरवर्षी हे धरण १५ ऑगस्टच्या आसपास भरल्याचे जाहीर केले जाते.

मात्र अजून भंडारदरा धरण भरल्याचे जाहीर केले नसले, तरी यंदाही १५ ऑगस्टच्या आतमध्येच धरण भरण्याचे जाहीर केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.

निळवंडे धरणात ८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजून धरणाला ओव्हरफ्लो होण्यासाठी साधारण दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. हरिश्‍चंद्र गड परिसरात पाऊस टिकून असल्यामुळे मुळा धरणातही पाणीसाठा वाढत आहे.

आतापर्यंत २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात साडेअठरा टीएमसी पाणी जमा झाले आहे. शुक्रवारी सकाळी धरणात साडेचार हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच गेल्या २४ तासांत घाटघरला ७५, रतनवाडीला ७९, पांजरेला ६७, वाकीला ४६, भंडारदरा येथे ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Farmer Income: शेतकऱ्यांचं चांगभलं!

Ginger Price: आले बियाण्याच्या गाडीला २५ ते २६ हजार रुपये दर

Summer Weather Alert: उन्हाच्या चटक्यात सातत्यपूर्ण वाढ वादळी पावसाचा अंदाज कायम

Uddhav Thackeray: आम्ही कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली- उद्धव ठाकरे

Farm Labour Shortage: शेतमजुरांची टंचाई; सालगडी मजुरी अडीच लाखांवर

SCROLL FOR NEXT