Uddhav Thackeray On Farm Loan Waiver: कोणीही न मागता, कोणताही अभ्यास न करता आम्ही अन्नदात्याचे २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माफ केले. त्याबद्दल मला एक समाधान आहे. शेतकऱ्याला कोणताही त्रास न देता, अटीतटीचा सामना करायला न लावता, दोनवेळा तो केंद्रात गेल्यानंतर त्याच्या खात्यात पैसे जमा झाले आणि तो कर्जमुक्त झाला, असे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. २४ मार्च) विधानपरिषदेत निरोपाच्या भाषणात बोलताना म्हटले. .आज उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांना विधानपरिषदेत निरोप देण्यात आला. त्यात नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि इतरांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या रोखठोक स्वभावाबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा 'साहेब' असा उल्लेख केला. .विधानपरिषदेत बोलताना ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख केला. आम्ही शेतकरी कर्जमाफी केली, पण दुर्दैवाने नंतर कोरोनाची साथ आली आणि प्रोत्साहनपर रक्कम द्यायची होती ती राहून गेली. ते आता सरकार देत आहे, असे ठाकरे म्हणाले. .Farm Loan Waiver: कर्जाच्या पुनर्गठनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही मिळणार नाही का?.आम्ही गोरगरिबांसाठी १० रुपयांत शिवभोजन देणे सुरु केले. त्याची अंमलबजावणी आम्ही अडीच वर्षे करुन दाखवली. कोरोनामध्ये सगळीकडे हाहाकार उडाला असताना महाराष्ट्र कुठेही थांबू दिला नाही. शेतकऱ्यांची कामे सुरु होती. परदेशी गुंतवणूक आम्ही उद्योगांत आणली. समझोता करार झाले होते. प्रत्यक्षात गुंतवणूकही आली. कुणतेही क्षेत्र असो तिथे महाराष्ट्र थांबला नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आम्ही त्या काळातदेखील सुरु ठेवला. मुंबईच्या कोस्टल रस्त्याचे काम सुरु ठेवले होते. अटल सेतूचे काम सुरु ठेवले. मेट्रोचे काम सुरु ठेवल्याचे त्यांनी नमूद केले..Farm Loan Waiver: कर्जमाफीचे निकष किचकट नसतील.''अडीच वर्षांतील कालखंड भयानक होता. कोरोनासारखे संकट कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. सहा वर्षांपूर्वी ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता होती, आज गॅसच सिलिंडरची कमतरता आहे,'' असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला..सर्व सहकाऱ्यांनी, मंत्रिमंडळ आणि प्रशासनाने सहकार्य केले. टास्क फोर्स तयार केले. जबाबदारी आल्यावर पळ काढणे मर्दाचे लक्षण नाही. त्यासाठी जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. प्रशासनाचा गंधही नसलेला माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसतो. तो राज्य चालवतो ते या सगळ्यांच्या सहकाऱ्याशिवाय शक्य झाले नसते. माझ्या निरोपासाठी मुख्यमंत्री महोदय हजार राहिलात त्याबद्दल धन्यवाद, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.