Rural Economy Growth: ‘‘आम्ही शेती क्षेत्रासाठी गांभीर्याने उपाययोजना केल्या. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविली. शेती उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याचे काम केले. यामुळे काही शेतकऱ्यांचे दुपटीने, तर काहींचे आठ पटीने उत्पन्न वाढले,’’ असा दावा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. २४) लोकसभेत केला..शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरून या वेळी लोकसभेत जोरदार चर्चा झाली. ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुपटीने वाढवू, असे आश्वासन सरकारने दिले होते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने कधीपर्यंत वाढेल आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्यावर कधी येईल, असा प्रश्न खासदार सौगत रॉय यांनी विचारला होता. त्यावर कृषिमंत्र्यांनी उत्तरादाखल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले..Agriculture Growth Decline: कृषी क्षेत्राची मोठी पडझड.चौहान म्हणाले, की काही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे, हे मी जबाबदारीने सांगत आहे. केवळ दुपटीनेच नव्हे, तर काही शेतकऱ्यांचे उत्पन्न तिपटीने वाढले. काहींचे चार पटीने, आठ पटीने वाढले आहे. ज्यांच्याकडून चुकीचे ‘नॅरेटिव्ह’ तयार केले जात आहे, त्यांच्या सरकारच्या काळात वीज, पाणी व रस्ते नव्हते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला..चौहान यांनी या वेळी मध्य प्रदेशचे उदाहरण दिले. ते म्हणाले, की ज्या वेळी तुमचे सरकार होते; तेव्हा एकच पीक घेतले जात होते. तेव्हा शेतकऱ्यांना वीज कमी मिळत होती, तर अधिक खंडित होत होती. वीजबिले भलीमोठी येत होती. पण आम्ही सिंचन वाढविले. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवली. आज मध्य प्रदेशात काही ठिकाणी तीन- तीन पिके घेतली जात आहेत. अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे..Maharashtra Economic Growth: राज्याचा विकास दर ७.९ टक्के राहणार; सेवा क्षेत्राची दमदार कामगिरी: आर्थिक पाहणी अहवालातील माहिती.पाच लाख कोटींहून अधिक तरतूदआम्ही गांभीर्याने उपाययोजना केल्या आहेत. आम्ही शेतीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद १९,३०६ कोटी रुपयांवरून वाढवून १ लाख ३० हजार कोटी रुपयांपर्यंत नेली. शेती आणि शेतीशी संलग्न क्षेत्रासाठी मिळून ५ लाख कोटींहून अधिक तरतूद केली. शेतीतून उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असा आमचा प्रयत्न राहिला. मोदी सरकारकडून पीएम किसान योजनेचे ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात. .सरकार १ लाख ८६ हजार कोटी रुपये अनुदान खतांवर देत आहे. वित्तीय संस्थांकडून दिले जाणारे कर्ज वाढवून ते २८ लाख कोटी रुपये केले. हे सर्व एनडीए सरकारने केले, असे कृषिमंत्री चौहान यांनी या वेळी सांगितले.ज्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले आहे; त्यांची नावेही त्यांनी सभागृहात वाचून दाखवली.उत्पन्न वाढलेल्या शेतकऱ्यांची नावेही त्यांनी यावेळी सभागृहात वाचून दाखविली..ऊस उत्पादकांना विशेष पॅकेज नाहीतमिळनाडूतील कुड्डालोरचे काँग्रेसचे खासदार डॉ. एम. के. विष्णू प्रसाद यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि विशेष पॅकेज देण्याची मागणी केली. ते म्हणाले, की कुड्डालोर जिल्हा हा ऊस उत्पादन घेणारा पट्टा आहे. पण त्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. मजूर मिळत नाहीत. किमान आधारभूत किंमत प्रति टन ३,२९० रुपये आहे. १०० रुपये वाहतूक खर्च आहे..त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान, विशेष पॅकेज देणार आहात का, असा प्रश्न विष्णू प्रसाद यांनी केला. त्यावर उत्तर देताना चौहान म्हणाले, की विशेष पॅकेज देण्याचा कोणताही प्रश्न नाही. आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत..कृषिमंत्री उवाच...- राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ- संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात वीज, पाणी, रस्त्यांची बिकट अवस्था- सिंचन उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांकडून पिकांच्या संख्येत वाढ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.